शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, सपा, लोकदलाची उत्तर प्रदेशात महाआघाडी?

By admin | Updated: December 26, 2016 01:02 IST

उत्तर प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बिहारच्या धर्तीवर काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीच्या स्वरूपात निवडणुकीत उतरणार आहेत.

शीलेश शर्मा /नवी दिल्लीउत्तर प्रदेशात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बिहारच्या धर्तीवर काँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीच्या स्वरूपात निवडणुकीत उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाआघाडीला जेडीयू आणि राजद हे पक्षही सहकार्य करण्यासाठी तयार होत असल्याचे दिसत आहे. अर्थात, उत्तर प्रदेशात जेडीयू, राजदचे फारसे अस्तित्व नसले तरी त्यांचे समर्थन गैर भाजप मतांना एकत्रित करण्यासाठी मदत करू शकते. या महाआघाडीबाबत सहमती झाली असली तरी कोण किती जागा लढविणार हे अद्याप ठरलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँगे्रसने १५० जागांवर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव सपाच्या समोर ठेवला आहे; पण सपा यासाठी तयार नाही. काँगे्रस आणि सपा यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा आकडा १५० वरून ११५ वर आला आहे. गुलाम नबी आझाद आणि प्रशांत किशोर हे मुलायमसिंह यांच्याशी चर्चा करीत आहेत, तर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे थेट मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे अजितसिंह हे मुलायमसिंह यांच्या संपर्कात आहेत. यावरून हे संकेत मिळत आहेत की, आगामी दोन आठवड्यांत ही महाआघाडी आकाराला येईल. याच महाआघाडीच्या कारणास्तव काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. दुसरीकडे काँगे्रसने पंजाबमध्ये आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अन्य पक्षांची झोप उडालीकाँग्रेस, सपा आणि राष्ट्रीय लोकदल एका व्यासपीठावर येण्याच्या वृत्ताने भाजप नेतृत्वाची झोप उडविली आहे.बसपाच्या प्रमुख मायावतीही यामुळे बेचैन आहेत. त्यांना आता याची भीती वाटत आहे की, ज्या सोशल इंजिनीअरिंगच्या जोरावर निवडणूक रणनीती आखण्यात येत होती त्यालाच या महाआघाडीमुळे धक्का बसू शकतो, तसेच मुस्लिम मतदारही त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो.