शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींकडे द्या काँग्रेस पक्षाची धुरा

By admin | Updated: November 8, 2016 05:29 IST

काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपविण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली.

शीलेश शर्मा , नवी दिल्लीकाँग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धूरा सोपविण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष होणार याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र कार्यकारिणीतील ही मागणी हे त्या दिशेने कदाचित पहिले पाऊल, असावे, असे निरीक्षकांना वाटते.पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने कार्यकारिणीची बैठक उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य ए. के. अ‍ॅन्थनी यांनी बैठकीत हा विषय काढला व राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, अशी त्यांनी उघडपणे मागणी केली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अ‍ॅन्थनी यांच्या म्हणण्यास अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यकारिणीच्या इतरही सर्व सदस्यांनी यास पाठिंबा दिला. सोनिया गांधी यांना भेटून कार्यकारिणीत व्यक्त झालेली ही भावना त्यांना कळविण्याचे ठरले,असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारचा हा घटनाक्रम पूवर्नियोजित असावा व राहुल गांधी यांना पक्षप्रमुखपदी आणण्याचे हे सूतोवाच असावे, असे निरीक्षकांना वाटते.निरीक्षकांच्या मते काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती पाहता पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पूर्वकल्पना न देता किंवा त्यांच्या संमतीविना या हालचाली एवढ्या उघडपणे होणे शक्य नाही. तरीही पक्षात नेतृत्वबदल नेमका केव्हा होईल व झालाच तरी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिले जाईल की त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते हे बदल करण्यासाठी पक्षांतर्गत निवडणुका व्हाव्या लागतील. त्यामुळे बदल कदाचित चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर होतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)