शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद नाहीच

By admin | Updated: August 20, 2014 02:50 IST

लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी मंगळवारी फेटाळली.

नवी दिल्ली : लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनी मंगळवारी फेटाळली. मी सभागृहाचे नियम आणि परंपरेचा अभ्यास केला आहे, असे त्या काँग्रेसची मागणी फेटाळण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हणाल्या.
महाजन यांनी एका पत्रद्वारे आपला निर्णय काँग्रेसला कळविला आहे. मल्लिकाजरुन खरगे हे काँग्रेसचे लोकसभेतील नेते असून, त्यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाजन यांना पाठविलेल्या पत्रत केली होती. काँग्रेसकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळविण्याजोगे संख्याबळ नसल्याचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी महाजन यांनी मागितलेल्या अभिप्रायानुसार स्पष्ट केले होते. काँग्रेसकडे लोकसभेत 44 जागा असून, 282 जागा मिळविणा:या भाजपानंतर तो दुस:या क्रमांकाचा पक्ष आहे. 
विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यासाठी किमान 55 जागांची आवश्यकता असल्यामुळे मी काँग्रेसला हा दर्जा देऊ शकत नाही, असे महाजन यांनी सभागृहाच्या नियमांवर बोट ठेवत स्पष्ट केले होते. 
या निर्णयानंतर काँग्रेसनेते मल्लिकाजरुन खरगे म्हणाले की, मी काँग्रेसश्रेष्ठी आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या कायदा सेलशी सल्लामसलत करणार आहे. सभागृहात नेता म्हणून काम करणो आणि विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा मिळणो ही वेगवेगळी बाब आहे.
 
च्198क् आणि 1984 साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते आणि कोणत्याही विरोधी पक्षाला लोकसभेत हा दर्जा दिला नव्हता, असा दाखला महाजन यांनी दिला.
च्संसदेतील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. केंद्रीय माहिती आयोगासारख्या(सीआयसी) नियुक्त्यांबाबत विरोधी पक्षनेत्याचे मत महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे हा दर्जा आवश्यक मानला जातो. 
च्पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता या तिघांची समिती केंद्रीय माहिती आयुक्त किंवा केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या नावांबाबत शिफारस करतात, त्यानंतर राष्ट्रपती या पदावर नियुक्ती करतात. 
 
तिकीट वाटपाची बैठक रद्द
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्लीबाहेर असल्याने त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी होणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द करण्यात आली. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भातील ही बैठक बुधवारी होण्याची शक्यता आहे.