शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंना दहशतवादी सिद्ध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 03:44 IST

जम्मूतील पोलीस उप अधीक्षकाच्या अटकेचे प्रकरण तापले

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेले उप पोलीस अधीक्षक दविंदर सिंग यांच्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस हिंदुंना दहशतवादी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असून पाकिस्तानची बाजू घेत आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याबद्दल दविंदर सिंग यांना अटक झाली असून कायदा त्याचे काम करीत आहे. परंतु, काँग्रेसचा हातखंडा ज्यात आहे तेच काम तो करीत आहे.काँग्रेसने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला व तो पाकिस्तानला वाचवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्या पक्षाचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी या प्रकरणी धर्म शोधून काढला आहे. काँग्रेस हिंदुंना दहशतवादी सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत असून भारताला हिंदुंपासून धोका असल्याचे त्याचे म्हणणे आहे.’

‘पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याबद्दल जर काँग्रेसला संशय असले तर त्याने याचा खुलासा जाहीरपणे करायला हवा’, असे पात्रा म्हणाले. भारताच्या लष्करावर आमचा विश्वास नाही हे काँग्रेसने जाहीर करायला हवे. पाकिस्तान व काँग्रेस यांच्यात काही तरी नाते असावे. कारण हा पक्ष पाकिस्तानची भाषा वारंवार बोलत असतो. काँग्रेस लष्कराच्या नव्या प्रमुखांवरही शेरेबाजी करतो. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये घेऊन पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांत जाईल व भारतावर टीका करील, असेही संबित पात्रा म्हणाले.

तत्पूर्वी, अधिर रंजन चौधरी पुलवामा हल्ल्यावर प्रश्नचिन्ह लावून टिष्ट्वटरवर म्हणाले होते की, ‘दविंदर सिंग हे मूळात देवेंद्र सिंह असले असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रोल लष्कराची प्रतिक्रिया जास्त तिखट असती. देशाच्या शत्रुची निंदा धर्म, पंथ आणि रंग बाजुला ठेवून व्हायला हवी.’

टॅग्स :HinduहिंदूBJPभाजपाcongressकाँग्रेस