शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणीतील कायदा रद्द करण्याची आयोगाची शिफारस

By admin | Updated: November 20, 2014 04:08 IST

अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्याची शिफारस करणाऱ्या कायदा आयोगाने आता सन १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली एक विशेष तरतूद

नवी दिल्ली : अनेक कालबाह्य कायदे रद्द करण्याची शिफारस करणाऱ्या कायदा आयोगाने आता सन १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली एक विशेष तरतूद रद्द करण्याची शिफारस केली आहे़ आणीबाणीदरम्यान हा कायदा अस्तित्वात आला होता़ लोकनियुक्त कुठलाही लोकप्रतिनिधी पंतप्रधान वा लोकसभा अध्यक्ष झाला असेल वा होणार असेल तर त्याच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असा हा कायदा सांगतो़आणीबाणीच्या ३७ वर्षांनंतर नरेंद्र मोदी सरकारने हा ‘विवादित निवडणूक(पंतप्रधान आणि लोकसभाध्यक्ष) कायदा १९७७’ संपुष्टात आणण्याची तयारी चालवली आहे़ अनुच्छेद ३२९ अ अन्वये राज्यघटनेत ही विशेष तरतूद समाविष्ट करण्यात आली होती़ त्यानुसार निवडून आलेला लोकप्रतिनिधी पंतप्रधान वा लोकसभाध्यक्ष असेल वा होणार असेल तर त्याच्याविरुद्ध अन्य कुठलाही कायदा लागू होणार नाही़ अशा स्थितीत ‘विवादित निवडणूक (पंतप्रधान आणि लोकसभाध्यक्ष) कायदा १९७७’ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश एक स्वतंत्र प्राधिकरण म्हणून संबंधित लोकप्रतिनिधीविरुद्धच्या निवडणूक याचिकेची सुनावणी करेल़ या प्राधिकरणाचा निर्णय अंतिम असेल़आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्या जनता दलाच्या सरकारने या कायद्याचा मूळ स्रोत असलेली अनुच्छेद ३२९अ ची घटनादुरुस्ती रद्द केली. परंतु त्यानुसार केला गेलेला हा कायदा अद्यापही अस्तित्वात आहे़ मात्र आता राज्यघटनेचे पाठबळ नसल्याने आता या कायद्याची संवैधानिकता ‘संदिग्ध’ असल्याचे सांगून कायदा आयोगाने हा कायदा रद्दबातल ठरविण्याची शिफारस केली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)