शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

Citizenship Amendment Bill: शिवसेनेचा 'सेफ गेम'; भाजपासाठी सोपा झाला आकड्यांचा खेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:38 IST

शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत; नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन वारंवार भूमिका बदलणारी शिवसेना राज्यसभेत नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकावर आज राज्यसभेत मतदान झालं. या मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. मात्र याचा अप्रत्यक्ष फायदा सत्ताधारी भाजपाला झाला. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानं बहुमताचा आकडा खाली आला. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं १२५, तर विरोधात १०५ खासदारांनी मतदान केलं. याआधी शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाला पाठिंबा दिला होता. तर सामनामधून विधेयकावर जोरदार टीका केली होती. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर परवा लोकसभेत मतदान झालं. त्यावेळी ३११ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ८० सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. विशेष म्हणजे राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलेल्या शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याआधी सोमवारी शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून नागरिकत्व सुधारणा विधेयकावर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनं अनेकांना धक्का बसला.लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाच्या बाजूनं मतदान करताच काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. यानंतर शिवसेनेचा सूर काहीसा बदलला. विधेयकाबद्दल संभ्रम असून जोपर्यंत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं विधान शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. यानंतर आज राज्यसभेतील चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधेयकाबद्दल प्रश्न उपस्थित केले. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नयेत, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करेल, अशी चर्चा होती. मात्र राजकीय गोची झालेल्या शिवसेनेनं अखेर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत