शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

एकीकडे संचलन दुसरीकडे रॅली; शेतकरी आंदोलनाचा नवा अंक २६ जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 3:03 AM

दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या पोलिसांसोबत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची बैठक झाली.

विकास झाडे

नवी दिल्ली : सरतेशेवटी प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ही रॅली रिंग रोडवर न काढता पाच सीमांवरून काढली जाईल आणि त्याच ठिकाणी परत  येईल, अशी माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. रविवारी या रॅलीचे मार्ग ठरविण्यात येतील. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी राजपथावर संचलन सुरू असेल, तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांची रॅली निघाल्याचे चित्र पाहायला मिळेल. रॅलीची जोरदार तयारी सुरू असतानाच शेतकऱ्यांनी एका संशयित हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रॅलीत चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून व्यत्यय आणण्याचा कथित कट रचला असा संशय आहे.

संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या पोलिसांसोबत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात शहाजापूर, सिंघू, सिकरी आणि गाझीपूर सीमेवरून टॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. ही रॅली दिल्लीच्या दिशेने काही किलोमीटर अंतर येईल, पुन्हा परत त्याच ठिकाणी जाईल. या निर्णयामुळे शेतकरी आणि पोलिसांमधील चर्चा फलदायी ठरली आहे.

शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचा कट उधळला शेतकऱ्यांनी शुक्रवारी रात्री सिंघू सीमेवर एका संशयित हल्लखोराला पकडले आहे. आंदोलनात अडथळा आणण्याचा कट रचला असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. रॅलीच्या वेळी चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून व्यत्यय आणण्याचा कथित कट त्याने रचला असा संशय आहे.  हा तरुण माध्यमांसमोर म्हणाला, आम्हाला यासाठी शस्त्रे मिळाली होती. २६ तारखेला शेतकरी पुढे जायचे थांबले नाहीत तर त्यांना गोळी घालण्याचा आदेश होता. दहा जणांच्या दुसऱ्या पथकाने मागून गोळीबार केला असता. यामुळे दिल्ली पोलिसांना असे वाटेल की, शेतकऱ्यांनीच हे केले आहे.  संशयिताने म्होरक्याचे नाव प्रदीप सिंग असे असल्याचे व तो पोलीस विभागात असल्याचे सांगितले आहे. या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तो सोनीपत येथील निवासी आहे. शेतकऱ्यांनी दबाव आणून असे बोलायला सांगितले होते, असे त्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी