शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात मुख्य निवडणूक आयुक्तांची पायपीट, जाणून घेतल्या निवडणूक यंत्रणेसमोरील अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 05:35 IST

chamoli in uttarakhand : राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता.

चामोली : उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील डुमक व कलगोठ या  दोन गावांमध्ये मतदान केंद्रे उभारताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार शुक्रवारी डोंगराळ प्रदेशातून १८ किमी पायपीट करीत त्या परिसरात पोहोचले. त्यांच्या या प्रयत्नांचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
राजीवकुमार यांनी सांगितले की, उत्तराखंडमध्ये कोणत्याही निवडणुकांच्या वेळी डुमक व कलगोठ येथे मतदान केंद्रे उभारण्यासाठी कर्मचारी, तसेच सुरक्षा जवानांना तिथे पोहोचण्याकरिता तीन दिवस पायी चालत प्रवास करावा लागतो. इतक्या दुर्गम भागात निवडणुकांची पूर्वतयारी करणे हे एक प्रकारचे आव्हान आहे. या गोष्टी समजून घेण्यासाठी मी या दोन गावांना भेट दिली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी दौरा केलेली डुमक व कलगोठ गावे बद्रीनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये येतात.
राजीवकुमार यांनी अतिदुर्गम गावांचा दौरा केला त्याच दिवशी शुक्रवारी चंपावत विधानसभा मतदारसंघातील  पोटनिवडणुकीचाही निकाल लागणार होता. या पोटनिवडणुकीत उत्तराखंडचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे ५५ हजार मतांनी विजयी झाले. 
उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपचा विजय झाला असला तरी 
त्यावेळी पुष्करसिंह धामी यांचा पराजय झाला होता. मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी पुन्हा निवडणुकीत विजय मिळविणे धामी यांच्याकरिता आवश्यक होते. (वृत्तसंस्था)

आणखी गावांचा दौरा करणार
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, देशातील आणखी काही अतिदुर्गम भागातील गावांना मी भविष्यात भेट देणार आहे. या भागांमध्ये निवडणूक यंत्रणेला येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याचा विचार निवडणूक आयोग करणार आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडElectionनिवडणूक