शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
2
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
3
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
5
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
6
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
7
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
8
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
9
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
10
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
11
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
12
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
13
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
14
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
15
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
16
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
17
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
18
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
19
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
20
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
Daily Top 2Weekly Top 5

चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:18 IST

मालेगाव शहर २००६ मध्ये चार बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनेनंतर १९ वर्षांनी विशेष न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित केले.

मुंबई :  मालेगाव शहर २००६ मध्ये चार बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनेनंतर १९ वर्षांनी विशेष न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. दरम्यान, आरोपी मनोहर नरवारिया, राजेंद्र चौधरी, धन सिंग आणि लोकेश शर्मा यांनी आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले.

खून आणि कट रचणे यांसारख्या आरोपांसह आरोपींवर यूएपीए कलमांखाली विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. बाविस्कर यांनी आरोपींवर आरोप निश्चित केले. त्यामुळे आता आरोपींवर खटला चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी यापूर्वी आरोपींवर  मसुदा आरोप सादर केले होते. ३१ जुलै रोजी विशेष न्यायालयाने मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाचा निकाल देत सात आरोपींची सुटका केली. २००६ मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटलाही घटनेला १९ वर्षे उलटूनही सुरू झाला नाही. ८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये चार बॉम्बस्फोट झाले. तीन बॉम्बस्फोट हमीदिया मशीद आणि बडा कब्रस्तानच्या परिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर झाले, तर चौथा बॉम्बस्फोट मुशावरत चौकात झाला. यात ३१ जणांचा मृत्यू, तर ३१२ जण जखमी झाले होते.

असा चालला खटला
सुरुवातीला, आरोपी केलेल्या १३ पैकी ९ जणांना एटीएसने अटक केली. त्यानंतर हे प्रकरण वर्ग झाल्यानंतर सीबीआयने त्याच व्यक्तींच्या नावे पुरवणी आरोपपत्र दाखल केले. स्वामी असीमानंद यांनी २००६ च्या या बॉम्बस्फोटात उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता सुनील जोशी आणि त्याच्या माणसांचा हात असल्याचा कबुलीजबाब २०१० मध्ये दंडाधिकाऱ्यांसमोर दिला. त्यानंतर २०११ मध्ये तपास एनआयएकडे गेल्यानंतर असीमानंद यांनी जबाब मागे घेतला. मात्र, एनआयएने २०१३ मध्ये आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात त्यांनी एटीएसने अटक केलेल्या ९ जणांचा स्फोटात हात नसल्याचे म्हटले. त्यानंतर, २०१६ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने ९ मुस्लीम आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Malegaon Blast: Charges Framed After 19 Years; Special Court Hearing

Web Summary : Nineteen years after the 2006 Malegaon blasts, a special court framed charges against four accused. The accused pleaded not guilty. The trial will proceed under UAPA and other charges, following a complex legal history involving multiple investigations and acquittals.
टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटMaharashtraमहाराष्ट्र