मध्यप्रदेशमध्ये बस खाणीत कोसळली, 20 प्रवाशांचा मृत्यू

By Admin | Updated: October 14, 2016 12:54 IST2016-10-14T12:52:04+5:302016-10-14T12:54:05+5:30

रतलाम येथे बस पाण्याने भरलेल्या खाणीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Bus collapses in Madhya Pradesh, 20 passenger deaths | मध्यप्रदेशमध्ये बस खाणीत कोसळली, 20 प्रवाशांचा मृत्यू

मध्यप्रदेशमध्ये बस खाणीत कोसळली, 20 प्रवाशांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
भोपाल, दि. 14 - रतलाम येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. बस पाण्याने भरलेल्या खाणीत कोसळून अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजल्याच्या दरम्यान हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
 
बस वेगात जात असताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने खाणीत कोसळून अपघात झाल्याचं कळलं आहे. अपघातानंतर जीव वाचवण्याचा प्रवासी प्रयत्न करत होते मात्र बस पाण्यात खोल बुडण्यास सुरुवात झाल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेसेबीच्या सहाय्याने बसला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. 10 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ममता बस सर्व्हिसची ही बस होती अशी माहिती मिळाली आहे. 
 
 
 

Web Title: Bus collapses in Madhya Pradesh, 20 passenger deaths