शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

'नोकरशाह आमच्या चपला उचलण्याचे काम करतात'; भाजप नेत्या उमा भारतींचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 5:31 PM

'आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही.'

भोपाळ: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात,' असं उमा भारती म्हणाल्या.

ब्युरोक्रसी चपला उचलण्यासाठीमध्य प्रदेशात दारुबंदीविरोधात आंदोलन सुरू करणाऱ्या उमा भारती शिवराज सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्या या ब्युरोक्रसीवर केलेल्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. उमा भारती म्हणाल्या की, 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमची चप्पल उचलण्यासाठी आहे. ते आमच्या चपला उचलतात. तुम्हाला काय वाटतं नोकरशाह नेत्याला फिरवतात, तसं अजिबात नाही.' 

आम्ही त्यांना पगार देतो...'आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाइल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो', असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं आहे.

मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला होता की, मध्य प्रदेश सरकारला ओबीसी महासभेच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा ओबीसी महासभा रस्त्यावर उतरून भाजप खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा तीव्र विरोध करेल. या दरम्यान, ओबीसी महासभेच्या शिष्टमंडळाशी बोलताना उमा भारती यांनी नोकरशाहीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली.

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा