Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:58 PM2021-09-20T15:58:24+5:302021-09-20T16:04:49+5:30

Gujarat Drugs:गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Over 3,000 kg heroin seized in Gujarat's Mundra port | Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

googlenewsNext

अहमदाबाद:गुजरातमध्ये डीआरआय(महसूल गुप्तचर संचालनालय)ने ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन(ड्रग्स) जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 9 हजार कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत छापेमारी करण्यात येत आहे. 

अदानी पोर्टकडे मुंद्रा पोर्टची मालकी

मुंद्रा बंदराची मालकी अदानी पोर्टकडे आहे. अदानी पोर्ट ही प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी आहे. महसूल गुप्तचर संचालनालय आणि सीमाशुल्क विभागाच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. डीआरआय आणि कस्टमने गेल्या पाच दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. या कारवाईदरम्यान, मुंद्र पोर्टवरील दोन कंटेनरच्या तपासात 9 हजार करोड रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं. तसेच, या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून, या ड्रग्ज तस्करीत मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईनंतर डीआरआकडून देशातील पाच शहरांमध्ये तपास सुरु करण्यात आला.

टॅल्कम पावडर असल्यासं सांगितलं

डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरोइन घेऊन जाणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका फर्मने आयात केलं होतं. या फर्मने कंटेनरमध्ये 'टॅल्कम पावडर' असल्याचा बनाव केला होता. अफगाणिस्तानच्या कंधार येथील हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने हे कंटेनर निर्यात केलं होतं.
 

Read in English

Web Title: Over 3,000 kg heroin seized in Gujarat's Mundra port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.