शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आणि सरकार दोघेही भूमिकांवर ठाम; कोंडी कायम, मंगळवारी महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 06:55 IST

आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे.

हरीश गुप्ता / नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदाेलनाला परदेशातून प्राप्त हाेणाऱ्या निधीची ‘एनआयए’मार्फत चाैकशी करण्यावरून वातावरण तापले आहे. तर, दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह ताेमर यांनी मवाळ भूमिका घेऊन १९ जानेवारीला हाेणाऱ्या चर्चेबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. केंद्र सरकारला प्रजासत्ताक दिनापूर्वी या आंदाेलनाचा तिढा साेडवायचा असल्याचे ताेमर यांच्या भूमिकेतून दिसत आहे.आंदाेलनाचे समर्थन करणाऱ्या सुमारे ४० जणांसह काही स्वयंसेवी संस्थांना एनआयएने समन्स बजावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदाेलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ‘एनआयए’ने पंजाबी अभिनेता दीप सिद्धू यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नाेटीस दिली आहे. हा प्रकार सूडाच्या भावनेतून केल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. आंदाेलनामध्ये मदत करणाऱ्यांना सरकार देशद्राेही ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेपही करण्यात आला आहे.केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांची १९ जानेवारीला चर्चा हाेणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत ताेमर यांनी आश्वस्त केले असून, कृषी कायद्यांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे ताेमर यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीव्यतिरिक्त इतर पर्यायही मांडावेत, याचा ताेमर यांनी पुनरुच्चार केला. सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचीही पूसा परिसरात पहिली बैठक हाेणार आहे.सोमवारी सर्वोच्च न्यायालय नवी कृषी कायदे आणि शेतकऱ्यांच्या निदर्शनासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून काही हस्तक्षेप केला जाण्याची तसेच ट्रॅक्टर रॅलीच्या मुद्यावरही विचार करण्याची शक्यता आहे, अशी सरकारला अपेक्षा आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची सोमवारी, १९ जानेवरी पहिली बैठक होत आहे. राजपथावर ट्रॅक्टर रॅली काढून प्रजासत्ताक दिनाच्या प्रतिष्ठेतेला बट्टा लागेल, असे शेतकरी बांधवांनी काहीही करू नये, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही केले आहे.सुरक्षाव्यवस्थेत वाढ -- दहशतवादी दिल्लीमध्ये घातपात करू शकतात, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. - प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला १५ वर्षांहून लहान मुलांनी आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी ओळखपत्रे साेबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास चाैकशी करण्यात येईल, असे पाेलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी