bjp mp tirath singh rawat car accident on delhi haridwar highway | भाजपा खासदाराच्या गाडीला भीषण अपघात 
भाजपा खासदाराच्या गाडीला भीषण अपघात 

ठळक मुद्देभाजपा खासदाराच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.उत्तराखंडचे भाजपा खासदार तीरथ सिंह रावत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे.अपघातात रावत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नवी दिल्ली - भाजपा खासदाराच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीहून डेहरादूनला परतत असताना उत्तराखंडचे भाजपा खासदार तीरथ सिंह रावत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी दिल्ली-हरिद्वार महामार्गावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात रावत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडचे भाजपा खासदार तीरथ सिंह रावत यांच्या गाडीचा रविवारी (10 नोव्हेंबर) सकाळी भीषण अपघात झाला. दिल्लीहून डेहरादूनला परतत असताना समोरून येणाऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात अपघात झाला आहे. या अपघातात रावत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हरिद्वार येथील सिटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 


 

Web Title: bjp mp tirath singh rawat car accident on delhi haridwar highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.