शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 10:31 IST

भाजपाकडून पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये इशारा

नवी दिल्ली: सध्या भाजपाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारधारेबद्दल मार्गदर्शन दिलं जात आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. विचारधारेच्या विरोधात गेल्यास पदावरुन हटवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना भाजपाकडून प्रशिक्षणादरम्यान दिल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षकांकडून भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भाजपाचे 'पितामह' लालकृष्ण अडवाणी यांचं उदाहरण दिलं जात आहे. 'नवभारत टाइम्स'नं हे वृत्त दिलं आहे.कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान अडवाणींच्या २००५ च्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करुन दिली जात आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटल्यानं अडवाणी यांना भाजपाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं, हा संदर्भ भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला जात आहे. पक्षातील कोणतीही व्यक्ती विचारधारेपेक्षा श्रेष्ठ नाही, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष जे. पी. राठोड यांनी मार्गदर्शन शिबिरातील अडवाणींच्या उल्लेखावर भाष्य केलं. 

पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांवर झालेल्या कारवाईचा संदर्भ देऊन विचारधारेचं महत्त्व पटवून दिलं जात असल्याचं राठोड म्हणाले. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अडवाणींचं उदाहरण दिलं जात आहे. पक्षाच्या विचारधारेविरोधात विधान केल्यानं अडवाणींची अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती, याची आठवण आम्ही प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्यांना करुन देत आहोत, असं राठोड यांनी सांगितलं. 
काय म्हणाले होते अडवाणी?२००५ मध्ये अडवाणी पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांनी जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटलं होतं. जिन्ना हिंदू-मुस्लिम एकतेचे दूत होते, अशी स्तुतीसुमनं अडवाणींनी उधळली होती. यानंतर अडवाणींना पक्षाध्यक्ष पदावरुन दूर करण्यात आलं. अडवाणी यांच्या एका विधानामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. जिन्ना यांचं कौतुक केल्यानं अडवाणी यांची राजकीय घसरण सुरू झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. २००९ मध्ये भाजपानं अडवाणींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. मात्र त्या निवडणुकीत भाजपाचा पराभव केला. यंदा भाजपानं अडवाणींना गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तिकीटदेखील दिलं नाही.  

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ