शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये पुन्हा नितीश की सत्तापालट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:42 IST

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीए व महागठबंधन यापैकी कोण जिंकणार याची देशभर उत्सुकता आहे. या निकालामुळे केंद्रातील एनडीए सरकारमधील समीकरणेही बदलू शकतात.

एस. पी. सिन्हा, पत्रकार व राजकीय विश्लेषक

बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी रणशिंग फुंकले गेले असून, निवडणुकीच्या रणांगणात सर्व उमेदवारांनी आपापली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. येथे दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर, तर दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी एनडीए (जदयू, भाजप, हम, रालोमो) आणि महागठबंधन (राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी) यांच्यात आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या ‘जनसुराज’ पक्षाद्वारे या लढती तिरंगी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांचा जनतेमध्ये अद्याप फारसा प्रभाव जाणवत नाही.

एकीकडे एनडीए सत्ता टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे, तर दुसरीकडे महागठबंधनने देखील नितीश सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी कंबर कसली आहे. बेरोजगारी, स्थलांतर, कायदा-सुव्यवस्था आदी मुद्दे घेऊन महागठबंधन नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. त्याचवेळी, एनडीए लालू-राबडी युगातील 'जंगलराज'ची जनतेला आठवण करून देत आहे. त्या कालावधीतील भीषण गोष्टी वडीलधाऱ्या लोकांनी युवा पिढीला सांगाव्या, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 

लालू-राबडी यांच्या सत्ताकाळातील अनेक वाईट गोष्टींच्या आठवणी लोकांच्या मनात जाग्या होऊन ते राजदला पाठिंबा देणार नाहीत हा दृष्टिकोन मोदींच्या वक्तव्यामागे आहे. मात्र, राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्याबद्दल तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे हाही मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

तरुणांचे काय सांगणे आहे?

पाटणा विद्यापीठातील विद्यार्थी उमेशकुमार यांनी सांगितले की, तेजस्वी यादव व प्रशांत किशोर हे रोजगाराच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘वोटर अधिकार यात्रा’मुळे काँग्रेसच्या प्रचारात चैतन्य आले. मात्र, काँग्रेस राजदसोबत असल्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल बिहारमधील युवा पिढीला काय वाटते याबद्दल अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.

भाजपसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक

भाजपने ही निवडणूक आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनवली आहे. ४० स्टार प्रचारक, विविध राज्यांतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांना प्रचारासाठी पाचारण केले आहे. भाजपचे नेते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत.

काँग्रेस पुन्हा आपली ताकद दाखवणार?

बिहारमध्ये काँग्रेस पक्ष आपली  ताकद दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील काही निवडणुकांमध्ये फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार उभे करत असलेल्या काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांत चांगले यश मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ४८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्यापैकी अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचा थेट भाजपशी सामना आहे. पहिल्या टप्प्यात २४, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २४ जागांवर ही लढत रंगणार आहे.

नेत्यांचे दावे-प्रतिदावे

संजय झा (जदयू) : जंगलराजच्या काळात घराबाहेर पडायलाही लोक घाबरत असत. ते दिवस लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. मात्र, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारने उत्तम प्रगती केली आहे.

अरविंद कुमार सिंह (भाजप) : राजदच्या जंगलराजमध्ये लोक हैराण होते. आता बिहार विकासाच्या मार्गावर आहे.

मृत्युंजय तिवारी (राजद) : नितीशकुमार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. नोकरशहा सरकार चालवत आहेत.  सत्तापालट होणे गरजेचे असून तेजस्वी यादवच हा बदल घडवू शकतात.

‘माय’ प्लस ‘ए टू झेड’ राजदची रणनीती 

राजद ‘माय’ (मुस्लिम-यादव) या  समीकरणाबरोबरच सवर्ण मतदारांना (ए टू झेड) आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीचा मुद्दा लावून धरला असून, महिला आणि तरुण मतदार त्यांच्या केंद्रस्थानी आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Elections: Nitish's Reign or a Power Shift Imminent?

Web Summary : Bihar elections see a fight between NDA and Mahagathbandhan. Key issues include unemployment and law & order. BJP emphasizes past 'jungle raj,' while youth are drawn to Tejashwi Yadav. Congress aims to regain strength.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण