शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणूक लोजप स्वबळावर लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 01:09 IST

Bihar Assembly Election 2020: भाजपशी नव्हे, जनता दलाच्या (यू) उमेदवारांशी संघर्ष

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाने (लोजप) बिहार विधानसभा निवडणूक राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) राहून नव्हे, तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयानुसार पक्ष स्वतंत्रपणे लढणार असला तरी रालोआशी मैत्री सोडणार नाही. पक्षाने स्पष्ट केले की, आमचा विरोध नितीश कुमार यांना आहे, भाजपला नाही.पक्षाचे सरचिटणीस अब्दुल खालीदने सांगितले की, ‘वैचारिक मतभेद असल्यामुळे लोजप ही विधानसभा निवडणूक जनता दलासोबत (यू) न लढता त्याच्या उमेदवारांविरोधात उमेदवार देईल; परंतु भाजपच्या उमेदवारांविरोधात लढणार नाही.’पक्षाने २०१७ मध्येही हेच सूत्र अवलंबले होते. तेव्हा पक्षाने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर ११ उमेदवार उतरवले होते. फक्त एक जण निवडून आला. त्याने सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. रालोआत असूनही २०१४ मध्ये जम्मू-कश्मीर व २०१९ मध्ये झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्ष स्वबळावर लढला होता. जनता दलही (यू) सतत लोजपला विरोध करतो आहे. पासवान यांची ४२ जागांवर निवडणूक लढण्याची इच्छा जनता दलाने (यू) फेटाळली होती. हाच मुद्दा घेऊन पासवान भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा व गृहमंत्री अमित शाह यांनाही अनेकदा भेटले; परंतु काहीही झाले नाही.‘बिहार फर्स्ट - बिहारी फर्स्ट’ची घोषणापक्षाचे नेतृत्व करीत असलेले चिराग पासवान यांनी आधीच म्हटले होते की, आम्ही स्वबळावर राज्यात २४३ जागांपैकी १४३ जागांवर उमेदवार देणार आहोत. रविवारी चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला की, पक्ष ‘बिहार फर्स्ट - बिहारी फर्स्ट’च्या घोषणेसह निवडणूक लढेल. बैठकीत भाजप-लोजप सरकारचा ठराव संमत केला गेला. त्यानुसार पक्षाचे सगळे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करताना राज्यात भाजप-लोजप सरकार बनवतील.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमारLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टी