“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:39 IST2026-01-22T10:38:36+5:302026-01-22T10:39:38+5:30

Congress RSS IB News: अनेकदा गुप्तचर संस्थेचे एजंट या संघटनांमध्ये कॅडर म्हणूनही प्रवेश करत असत, असा मोठा खुलासाही करण्यात आला.

big reveal by intelligence bureau police officer prakash singh said that congress monitored rss through ib | “काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

“काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

Congress RSS IB News: काँग्रेसचे नेते खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी असो किंवा देशभरातील अन्य काँग्रेसचे नेते असोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS वर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे पाहायला मिळते. राहुल गांधी सातत्याने संघावर, भाजपावर हल्लाबोल करताना दिसतात. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत असतात. अशातच काँग्रेसच्या कार्यकाळात गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून RSS वर नजर ठेवली जायची, असा मोठा दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसच्या कार्यकाळात इंटेलिजेंस ब्युरो (IB) हा विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि जमात-ए-इस्लामी यांसारख्या संघटनांच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवत असे, असा दावा निवृत्त आयपीएस अधिकारी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रकाश सिंह यांनी केला आहे. आयबीची कार्यशैली मानवी बुद्धिमत्तेवर आधारित होती. अनेकदा थेट संघटनांशी संवाद साधून किंवा कधीकधी त्यांच्याशी जोडलेल्या लोकांशी मैत्री करून एजन्सीचे कर्मचारी महत्त्वाची माहिती गोळा करायचे. माहिती देणाऱ्यांचे एक मजबूत नेटवर्क तयार केले जायचे, जे संवेदनशील क्षेत्रे आणि संघटनांबद्दल माहिती देत असत. या लोकांकडून गुप्तचर यंत्रणा इनपूट घेत असे, असेही ते म्हणाले.

गुप्तचर संस्थेच्या एजंट संघात कॅडर म्हणूनही कार्यरत

त्यांच्या मते, तत्कालीन काँग्रेस सरकार या संघटनांना सांप्रदायिक स्वरूपाच्या संस्था मानत असत. म्हणूनच गुप्तचर यंत्रणांना RSS च्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते. अनेक प्रकरणांमध्ये गुप्तचर संस्थेचे एजंट या संघटनांमध्ये कॅडर म्हणूनही प्रवेश करत असत, असा मोठा खुलासाही त्यांनी केला. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना प्रकाश सिंह यांनी याबाबत भाष्य केले.

दरम्यान, इंटेलिजेंस ब्युरोने काळानुसार आपल्या रणनीती विकसित केल्या. घुसखोरी व्यतिरिक्त, सोशल नेटवर्किंग आणि संपर्कांद्वारे माहिती गोळा करण्याच्या पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. या नवीन युगात तांत्रिक बुद्धिमत्तेची व्याप्ती देखील वेगाने विस्तारली आहे. संचार माध्यमांवर देखरेख ठेवणे, डिजिटल पॅटर्न नमुन्यांचे विश्लेषण करणे, तंत्रज्ञानाचा आधार प्रणाली म्हणून वापर करणे हे आयबीच्या कामकाजाचे अविभाज्य भाग बनले. एजन्सीचे प्राथमिक उद्दिष्ट घटनेनंतर प्रतिसाद देणे नव्हे तर लवकर इशारा देणे होते, असेही प्रकाश सिंह यांनी सांगितले.

 

Web Title : खुफिया एजेंसियों से RSS पर कांग्रेस की नजर: पूर्व IPS का दावा

Web Summary : पूर्व IPS प्रकाश सिंह का दावा है कि कांग्रेस ने IB का इस्तेमाल RSS, जमात-ए-इस्लामी पर नजर रखने के लिए किया। एजेंट कैडर के रूप में घुसपैठ करते थे। IB ने तकनीक का उपयोग किया।

Web Title : Congress spied on RSS via intelligence agencies, claims ex-IPS officer.

Web Summary : Ex-IPS Prakash Singh claims Congress used IB to monitor RSS, Jamaat-e-Islami. Agents infiltrated as cadres. IB evolved, using tech for early warnings.