शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

१२१ जणांच्या मृत्यूप्रकरणी 'भोले बाबा'ला क्लीन चिट; हाथरस चेंगराचेंगरीसाठी पोलीस दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:49 IST

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणात भोले बाबांना क्लीन चिट मिळाली असून न्यायिक आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी न्यायिक आयोगाने आपला अहवाल सादर केला आहे. या घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला. या अहवालात नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.  चेंगराचेंगरीसाठी पोलीस आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात आले आहे. अहवालानुसार, चेंगराचेंगरी झालेल्या सत्संगाच्या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षा मानकांचे पालन केलं नव्हतं असं म्हटलं आहे. याशिवाय या प्रकरणावरील एसआयटीच्या अहवालातही चेंगराचेंगरीसाठी आयोजकांना जबाबदार धरण्यात आले असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचे म्हटलं.

न्यायिक आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला. हा अहवाल सभागृहात ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. न्यायालयीन आयोगाने आपल्या अहवालात या घटनेसाठी पोलीस आणि सत्संगाच्या आयोजकांचे निष्काळजीपणा जबाबदार धरला आहे. तसेचभविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयोगाने सूचनाही दिल्या आहेत. यापुढे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी तसेच आयोजकांनी कोणत्या अटींवर कार्यक्रमासाठी परवानगी घेतली याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची तरतूद असावी, असं असे आयोगाने म्हटलं आहे.

गेल्या वर्षी २ जुलै रोजी हातरस येथील सिकंदरराव येथील फुलराई मुघलगढी गावात साकार नारायण विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये १२१ हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला. हातरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने २ जुलै २०२४ रोजी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रजेश कुमार श्रीवास्तव करत होते. तर निवृत्त आयएएस हेमंत राव आणि निवृत्त आयपीएस भावेश कुमार सिंह यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.

नारायण साकार हरी हे मूळचे एटा येथील पत्याळी तहसीलमधील बहादूरनगर गावचे रहिवासी आहेत. २६ वर्षांपूर्वी त्यांनी पोलीस खात्याची नोकरी सोडली आणि धार्मिक प्रवचन देण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवचनात साकार हरी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत असल्याचा दावाही करतात. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे त्यांचा आश्रम आहे. २०१४ पर्यंत साकार हरी यांनी त्यांच्या मूळ गावी बहादूरनगर येथे सत्संग केला. २०१४ नंतर त्यांनी इतर राज्यांचे दौरे सुरू केले. २००० मध्ये त्यांना एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी पुराव्याअभावी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश