West Bengal Bhawanipur Election: अबकी बार 'सिक्रेट प्रचार'! पश्चिम बंगालमध्ये भाजपानं घेतला धडा, प्रचाराची रणनिती बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:46 AM2021-09-18T11:46:57+5:302021-09-18T11:49:47+5:30

West Bengal Bhawanipur Election: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मेगा रॅलींनी प्रचाराचा धुरळा उडवलेल्या भाजपानं आता भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी नवी रणनिती आखली आहे.

bhawanipur by election west bengal cm mamata banerjee bjp candidate priyanka tibrewal new strategy secret campaign | West Bengal Bhawanipur Election: अबकी बार 'सिक्रेट प्रचार'! पश्चिम बंगालमध्ये भाजपानं घेतला धडा, प्रचाराची रणनिती बदलली

West Bengal Bhawanipur Election: अबकी बार 'सिक्रेट प्रचार'! पश्चिम बंगालमध्ये भाजपानं घेतला धडा, प्रचाराची रणनिती बदलली

Next

West Bengal Bhawanipur Election: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवेळी मेगा रॅलींनी प्रचाराचा धुरळा उडवलेल्या भाजपानं आता भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी नवी रणनिती आखली आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीवेळी ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदारसंघात भाजपाच्या सुवेंदु अधिकारी यांच्याविरोधात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर भवानीपूर मतदार संघात भाजपाच्या वतीनं प्रियांका टिबरवाल या ममता बॅनर्जी यांना जोरदार टक्कर देणार आहेत. 

भवानीपूर पोटनिवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जींकडे किती आहे संपत्ती?

विधानसभा निवडणुकीवेळी मेगा रॅलींवर भर देणाऱ्या भाजपानं यावेळी मात्र रॅलींवर लक्ष केंद्रीत न करता थेट मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याचा मार्ग निवडला आहे. भाजपा नेते मतदारांच्या थेट दारावर जाऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यांचे मुद्दे समजून घेत आहे. अशापद्धतीनं लोकांशी थेट संपर्क साधून प्रचाराची रणनिती भाजपानं आखल्याचं दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेली हिंसा अतिशय दुर्दैवी होती. यातूनच धडा घेऊन आता भाजपानं मतदारांशी थेट संपर्क साधण्याची रणनिती आखली आहे, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितलं. 

ठरलं! भवानीपूरमध्ये ममतांविरोधात BJPचं महिला कार्ड

निवडणूक प्रचारावेळी यावेळी आमची रणनिती खूप साधी आहे. कारण माध्यमांना घेऊन एखादा प्रचार केला तर तृणमूलचे कार्यकर्ते तिथं पोहोचतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देणं सुरू होतं. त्यामुळे तृणमूलच्या हिंसेला आम्ही शांततेनं प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं आहे. आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत, असंही दिलीप घोष म्हणाले. 

Web Title: bhawanipur by election west bengal cm mamata banerjee bjp candidate priyanka tibrewal new strategy secret campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.