शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्न हा तर सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब- ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 07:29 IST

देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानावरुन ओवेसींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली: एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारतरत्न म्हणजे सवर्ण आणि ब्राह्मणांचा क्लब असल्याचं वादग्रस्त विधान ओवेसी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे विधान केलं. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं तीन व्यक्तींना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव आणण्यात आला. त्यावर चर्चा सुरू असताना मोदी सरकारनं जाहीर केलेल्या भारतरत्न पुरस्कारांवर ओवेसींनी टीका केली. भारतरत्न हा तर ब्राह्मण आणि सवर्णांचा क्लब आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देताना पारदर्शकता पाळली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी चंद्रचूड समितीच्या अहवालाचा उल्लेख केला. दीन दयाळ उपाध्याय यांना भारतरत्न जाहीर झाला. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. इतिहासवर एक दृष्टीक्षेप टाकल्यास भारतरत्न म्हणजे केवळ सवर्णांचा क्लब असल्याचं तुमच्या लक्षात येईल, असं ओवेसी म्हणाले. गेल्या महिन्यातही ओवेसींनी भारतरत्नवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. किती दलित, आदिवासी, मुस्लिम यांना आतापर्यंत भारतरत्न देण्यात आला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेल्या भारतरत्न पुरस्कारावरही ओवेसींनी भाष्य केलं. आंबेडकर यांना नाखुशीनं भारतरत्न देण्यात आला. सरकारला गरज वाटली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. सरकारच्या चुकांमध्ये आज काश्मीरमधील समस्या आणखी गंभीर झाली आहे. मोदी काश्मीरमध्ये जातात. दल लेकची सफर करतात आणि बाजूला कोणीही नसताना हात दाखवत फिरतात. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज दक्षिण आशियात भारत एकाकी पडला आहे. या देशाला चौकीदाराची गदज नाही. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घटनेच्या विरुद्ध काम करत आहे, अशी टीका ओवेसींनी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी