लग्नापूर्वी संबंध ठेवताना सावधान! विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 05:45 IST2026-02-17T05:43:10+5:302026-02-17T05:45:42+5:30

लग्नापूर्वी मुलगा-मुलगी पूर्णपणे अनोळखी असतात त्यामुळे दक्षता गरजेची, विचारपूर्वक आणि संयमाने वागले पाहिजे

Be careful while having sex before marriage! Don't trust; Supreme Court advises | लग्नापूर्वी संबंध ठेवताना सावधान! विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

लग्नापूर्वी संबंध ठेवताना सावधान! विश्वास ठेवू नका; सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : लग्न करण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी एकमेकांना पूर्णपणे ओळखत नसतात. त्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंधांमध्ये गुंतताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे निरीक्षण सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

लग्नाआधी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला.  दिल्लीतील ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचे हे प्रकरण होते.

‘कदाचित आम्ही जुन्या विचारांचे असू’

लग्न करण्याचे खोटे आश्वासन देत एका महिलेवर बलात्कार झाल्याच्या आरोपाखालील एका व्यक्तीच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने मत नोंदवताना, आम्ही कदाचित जुन्या विचारांचे असू; पण लग्नापूर्वी मुलगा आणि मुलगी हे पूर्णपणे अनोळखी असतात. त्यामुळे शारीरिक संबंधांबाबत अत्यंत विचारपूर्वक आणि संयमाने वागले पाहिजे, असे स्पष्ट केले. या दोन्ही पक्षांना मध्यस्थीची शक्यता तपासण्यासही न्यायालयाने सांगितले. पुढील सुनावणी बुधवारी आहे.

न्यायालयाने काय नोंदवले निरीक्षण?

न्यायालयाने त्या महिलेला तुम्ही लग्नाबाबत इतक्या ठाम होता तर दुबईपर्यंत का गेल्या, असा सवाल केला. तुमचे संबंध प्राथमिकदृष्ट्या परस्पर संमतीच्या नात्याचे वाटतात. आम्ही कदाचित जुन्या विचारांचे असू; पण लग्नापूर्वी मुलगा व मुलगी हे पूर्णपणे अनोळखी असतात. अशा वेळी कोणावरही आंधळा विश्वास न ठेवता शारीरिक संबंधांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.

संमतीच्या नात्यांच्या प्रकरणांमध्ये फौजदारी खटला चालवून शिक्षा देण्याचा प्रश्न वेगळा असतो. या दोन्ही पक्षांनी तडजोडीची शक्यता तपासावी, तसेच आरोपीच्या वकिलांनी भरपाईबाबत विचार करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

विवाह संकेतस्थळावर ओळख, त्यानंतर लग्नाचे दिले वचन  

२०२२ मध्ये एका विवाह संकेतस्थळावर महिलेशी ओळख झाल्यानंतर एका व्यक्तीने लग्नाचे आश्वासन देत त्या महिलेला दिल्लीमध्ये बोलावले व तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या आग्रहावरून ती महिला दुबईलाही गेली. तेथेही त्या व्यक्तीने तिला लग्नाचे आश्वासन दिले.

संमतीशिवाय खासगी व्हिडीओही चित्रित केले आणि हे व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकीही दिल्याची महिलेची तक्रार होती. पण जानेवारी २०२४ मध्ये महिलेला त्या व्यक्तीचे पंजाबमध्ये दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावर महिलेने आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली आणि त्या व्यक्तीला अटक झाली.

या व्यक्तीला कनिष्ठ न्यायालय व दिल्ली उच्च न्यायालयाने जामीनही नाकारला होता. दोन्ही न्यायालयांनी लग्नाचे आश्वासन सुरूवातीपासून खोटे असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यावर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली.

Web Title : विवाह पूर्व संबंध: सुप्रीम कोर्ट ने अविश्वास की सलाह दी।

Web Summary : सुप्रीम कोर्ट ने विवाह पूर्व संबंधों में सावधानी बरतने की सलाह दी, यह कहते हुए कि जोड़े शुरू में अजनबी होते हैं। कोर्ट ने शादी के झूठे वादे के बाद बलात्कार के आरोपों के एक मामले की सुनवाई करते हुए पार्टियों के बीच सावधानीपूर्वक विचार और मध्यस्थता का आग्रह किया। एक महिला ने आरोप लगाया कि एक आदमी ने उससे ऑनलाइन मिलकर शादी का वादा किया, यौन उत्पीड़न किया और बाद में दूसरी महिला से शादी कर ली।

Web Title : Caution before premarital relations: Supreme Court advises against blind trust.

Web Summary : Supreme Court advises caution in premarital relationships, emphasizing that couples are initially strangers. The court heard a case involving rape allegations following a broken marriage promise, urging careful consideration and mediation between parties. A woman alleged deceit after a man she met online, promising marriage, sexually assaulted her and later married another woman.