...अन् तो भरधाव ट्रक काळ बनून आला; उत्तर प्रदेशात बस-ट्रकच्या धडकेत १८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:37 AM2021-07-28T07:37:15+5:302021-07-28T07:42:41+5:30

भीषण अपघातात १८ मृत्यूमुखी, २० जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

barabanki road accident truck collision with standing bus 18 killed and 20 injured | ...अन् तो भरधाव ट्रक काळ बनून आला; उत्तर प्रदेशात बस-ट्रकच्या धडकेत १८ जणांचा मृत्यू

...अन् तो भरधाव ट्रक काळ बनून आला; उत्तर प्रदेशात बस-ट्रकच्या धडकेत १८ जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनऊ-अयोध्या द्रुतगती मार्गावर कडेला उभ्या असलेल्या एका डबल डेकर बसला ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात १८ जण मरण पावले. 

बसमध्ये बिघाड झाल्यानं चालकानं रात्री ८ च्या सुमारास बस रस्त्याच्या कडेला उभी केली. रात्री १२ वाजता एका ट्रकनं या बसला जोरजार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की काही जणांचा जागीच मृत्यू झाला. हरयाणाच्या पलवलमधून निघालेली बस बिहारच्या दिशेनं जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस घटनास्थळी असून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे. बसमध्ये बिघाड झाल्यानं चालकानं प्रवाशांना आराम करण्यास सांगितलं. यानंतर चालक बस दुरुस्त करण्याचं काम करत होता. त्याचवेळी मागून आलेल्या एका ट्रकनं बसला जोरदार धडक दिली आणि अपघात झाला.

राम सनेही घाट परिसरात बस उभी असताना मागून आलेल्या ट्रकनं धडक दिल्याचं लखनऊ झोनचे एडीजी सत्यनारायण सबत यांनी सांगितलं. सध्या २० जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून काही मृतदेह बसखाली दबले आहेत. घटनास्थळी सध्या पोलिसांकडून मदतकार्य सुरू असल्याची माहिती सबत यांनी दिली.

Web Title: barabanki road accident truck collision with standing bus 18 killed and 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात