शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

Ayodhya Ram Mandir Land: 24 तासांतच सपा नेत्याच्या दाव्यांची पोलखोल, 10 वर्षांपूर्वीच झाले होते जमिनिचे अ‍ॅग्रीमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:00 IST

ट्रस्टच्या नावने संबंधित जमिनीचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट करणारे सुल्तान अंसारी म्हणाले, संबंधित जमिनीच्या विक्रीत ना आम्ही ना ट्रस्टने कसल्याही प्रकारची फसवणूक केली. घोटाळ्यांचा आरोप करणारे, अनावश्यक बडबड करत आहेत.

अयोध्या- रामजन्मभूमी परिसरापासून काही अंतरावरच असलेल्या मुहल्ला बाग बिजेसीच्या ज्या जमिनीच्या खरेदीसंदर्भात रविवारी सपा नेते तथा राज्य सरकारचे माजी मंत्री तेजनारायण पांडेय पवन यांनी घोटाळ्याचा आरोप केला होता, त्याची हवा केवळ 24 तासांच्या आतच निघायला सुरुवात झाली आहे. सपा नेत्याच्या आरोपाचा मुख्य आधार असा होता, की यावर्ष 18 मार्चला ज्या जमिनीचे तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 18.50 कोटी रुपयांत रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट केले, त्या जमिनीचे अ‍ॅग्रीमेंट करणारे रविमोहन तिवारी आणि सुल्तान अंसारी यांनी त्याच तारखेला 10 मिनिटांपूर्वीच केवळ दोन कोटी रुपयांत विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.

हे सांगतानाच माजी मंत्र्यांनी आरोप केला होता, की दोन कोटी रुपयांची जमीन 18.50 कोटी रुपयांत अ‍ॅग्रीमेंट करताना कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मात्र, सत्य असे आहे, की संबंधित जमिनीचे चार मार्च 2011 रोजीच म्हणजे 10 वर्षांपूर्वीच मो. इरफान, हरिदास तथा कुसूम पाठक यांनी दोन कोटी रुपयांत रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट केले होते. तीन वर्षांपूर्वी या अ‍ॅग्रीमेंटचे नुतनीकरणही करण्यात आले. 2017 मध्ये हरिदास तथा कुसूम पाठक यांनी जमिनीचे मालक नूर आलम, महफूज आलम आणि जावेद आलम यांच्याकडून या जमिनीचा लेखी करार केला आणि हरिदास व कुसूम पाठक यांच्याकडून ही जमीन 17 सप्टेंबर 2019 रोजी रविमोहन तिवारी, सुल्तान अंसारी आदी आठ लोकांनी अ‍ॅग्रीमेंट करून घेतली. तसेच रविमोहन तथा सुल्तान अंसारी यांनीच या जमिनीचा 18 मार्चला विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी

माजी मंत्री, जी जमीन दोन कोटी रुपयांची सांगून, ती 18.50 कोटी रुपयांत विकत घेण्यावर आक्षेप घेत आहेत, तिचा ठरलेला भाव चार हजार आठशे रुपये चौरस मीटरने देखील त्याची किंमत पाच कोटी 79 लाख 84 हजारपर्यंत जाते. तर बाग बिजेसी तथा रामनगरीच्या जवळपसच्या जमिनीचा सध्याचा सरासरी भाव दो हजार रुपये चौरस फूट आहे आणि याचा विचार करता, ट्रस्टने संबंधित जमिनीसाठी सरासही किंमतीपेक्षाही अत्यंत कमी किंमत मोजली आहे. संबंधीत जमिनीचे क्षेत्रफळ 12 हजार 80 चौरस मीटर, म्हणजेच एक लाख 29 हजार 981 चौरस फूट आहे. आणि या हिशेबाने ट्रस्टने 1423 रुपये चौरस फूट प्रमाणे जमिनीसाठी पैसे मोजले आहेत. 

संत मंडळींत आक्रोश, असे आरोप म्हणजे कट-कारस्थान - रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर माजी मंत्र्याने तथा सपा नेत्याने केलेल्या आरोपांमुळे साधू-संत संतापले आहेत. रामललाचे मुख्य आचार्य सत्येंद्रदास म्हणाले, अशा प्रकारचे आरोप करण्यासाठी लोक स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या समाधानासाठी चौकशीही केली जाऊ शकते. मात्र, ट्रस्टचा प्रामाणिकपणा आणि रामललांच्या प्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. 

राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा?; अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे झाले १८ कोटी

कुणाचीही फसवणूक झालेली नाही - सुल्तानट्रस्टच्या नावने संबंधित जमिनीचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट करणारे सुल्तान अंसारी म्हणाले, संबंधित जमिनीच्या विक्रीत ना आम्ही ना ट्रस्टने कसल्याही प्रकारची फसवणूक केली. घोटाळ्यांचा आरोप करणारे, अनावश्यक बडबड करत आहेत. सत्य, असे आहे, की दहा वर्षांपूर्वी अयोध्येत जमीनीची किंम्मत अत्यंत कमी होती, तेव्हाच आम्ही दोन कोटी रुपयांत संबंधित जमिनीचे अ‍ॅग्रीमेंट केले होते. तीर्थ क्षेत्राला दिलेल्या जमिनीत घोटाळा करण्यात आला, असे म्हणणे चुकीचे आहे. खरे तर राम मंदिरासाठी सहकार्याची भावना मनात ठेवून या जमिनीचे बाजार भावापेक्षाही खूप कमी किंमती अ‍ॅग्रीमेंट करण्यात आले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश