शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या उभारणीसाठी आलेले २२ कोटी रूपयांचे चेक बाऊन्स; ट्रस्टनं सांगितलं 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 11:14 IST

१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान देशात राबवण्यात आली होती समर्पण निधी मोहीम. २२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची समोर आली माहिती.

ठळक मुद्दे१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान देशात राबवण्यात आली होती समर्पण निधी मोहीम.२२ कोटींचे चेक बाऊन्स झाल्याची समोर आली माहिती.

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान समर्पण निधी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान मिळेलेले तब्बल १५ हजार चेक बाऊन्स झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या चेकचं मूल्य २२ कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनंदेखील माहिती दिली आहे. हे चेक बाऊन्स होण्यामागे तांत्रिक कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं. मोठ्या प्रमाणात चेक बाऊन्स झाल्यामुळे तसंच यामागे काही तांत्रिक कारण असल्याचं समोर आल्यानंतर यासंदर्भात एक टीम तयार करण्यात आली आहे. ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत त्यांच्याशी ही टीम संपर्क साधणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्र यांच्यानुसार हे चेक बाऊन्स होण्यामागे तांत्रिक कारण आहे. ज्यांचे चेक बाऊन्स झाले आहेत त्यापैकी काही जणांनी नवे चेक दिले आहे आणि त्यापैकी काही क्लिअरही झाले आहेत. तर अन्य लोकांशी संपर्क साधला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.२५०० कोटी जमल्याचा अंदाजराम मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशात समर्पण निधी मोहीम चालवण्यात आली होती. यादरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी घराघरांत जाऊन निधी गोळा करण्यात आला होता. याद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम बँकेत जमा  करण्यात आली होती. यादरम्यान, समन्वयासाठी ४९ नियंत्रण केंद्र उभारण्यात आले होते. तर दिल्लीत मुख्य केंद्रावर चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या देखरेखीखाली २३ जणांच्या टीमनं संपूर्ण भारतातून जमा झालेल्या रकमेवर आणि डिपॉझिट करण्यात आलेल्या रकमेवर लक्ष ठेवलं. निधी समर्पण मोहिमेदरम्यान ४ मार्चपर्यंत २५०० कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली असल्याची माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याMONEYपैसा