ग्राहकांनो लक्ष द्या! अंड्यांवर आता 'एक्सपायरी डेट' असणे बंधनकारक; या राज्याने काढला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:41 IST2026-03-17T10:24:21+5:302026-03-17T10:41:16+5:30
उत्तर प्रदेश सरकारने आता अंड्यांच्या व्यापारावर कडक नियंत्रण आणले आहे, यामुळे ताजी अंडी असल्याचा दावा करून जुनी अंडी विकणाऱ्यांना ते अशक्य झाले आहे. १ एप्रिलपासून, उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक अंड्यावर मुदत समाप्तीची तारीख छापणे अनिवार्य केले आहे.

ग्राहकांनो लक्ष द्या! अंड्यांवर आता 'एक्सपायरी डेट' असणे बंधनकारक; या राज्याने काढला आदेश
तुम्ही रोज खात असलेली अंडी ताजी आहेत की अनेक दिवस शीतगृहात पडून राहिलेली शिळी? आता याचे टेन्शन घेण्याची गरज नाही. उत्तर प्रदेश सरकारने ग्राहकांच्या आरोग्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, आता प्रत्येक अंड्यावर 'मॅन्युफॅक्चरिंग' आणि 'एक्सपायरी डेट' छापणे अनिवार्य केले आहे.
हरीश राणाचा मृत्यूकडे प्रवास सुरु! आजपासून पाणी देणे बंद केले, कुटुंबीयांसाठी क्षण भावूक...
१ एप्रिलपासून नवा नियम लागू
उत्तर प्रदेशातील पशुसंवर्धन आणि अन्न सुरक्षा विभागाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून कोणत्याही दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला तारीख नसलेली अंडी विकता येणार नाहीत. यामुळे ग्राहकांना अंडे किती जुने आहे आणि ते खाण्यासाठी सुरक्षित आहे का, हे स्वतः तपासून घेता येईल.
अंडी नक्की किती काळ टिकतात?
अनेकदा आपल्याला अंडी किती जुनी आहेत हे कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमान (३०°C): अंडी केवळ २ आठवडे चांगली राहतात.
थंड तापमान (२ ते ८°C)
फ्रिजमध्ये ठेवल्यास ५ आठवड्यांपर्यंत अंडी वापरता येतात.
नियम मोडल्यास कडक कारवाई!
जर एखाद्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांची अंडी जप्त केली जातील. ही अंडी एकतर नष्ट केली जातील किंवा ती 'मानवी सेवनासाठी असुरक्षित' असल्याचे शिक्कामोर्तब केले जाईल. विभागाने कडक तपासणी मोहिमेचे संकेत दिले आहेत.
शीतगृहांची 'कसोटी'
उत्तर प्रदेशात सध्या आग्रा आणि झाशी येथे मुख्य शीतगृहे आहेत. अन्न सुरक्षा नियमांनुसार अंडी आणि भाज्या एकाच जागी ठेवता येत नाहीत. त्यामुळे, सुविधा मर्यादित असल्या तरी सरकारने आता स्वच्छ शब्दांत ताकीद दिली आहे की, 'सुविधा नाही' ही सबब चालणार नाही, नियमांचे पालन करावेच लागेल.