कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 02:07 AM2020-09-24T02:07:29+5:302020-09-24T02:08:09+5:30

सरकारच्या परवानगीची गरज लागणार नाही. आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजी मताने औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षेशी संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली.

Approval of three major labor reform bills in parliament | कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजुरी

कर्मचाऱ्यांना विनापरवानगी नोकरीवरून काढू शकणार; तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयकांना मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेने बुधवारी तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार आहे.


आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजी मताने औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षेशी संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली.

कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितले...
बदलत्या व्यावसायिक वातावरणाला योग्य अशी पारदर्शक प्रणाली तयार करणे, हा या कामगार सुधारणांचा हेतू आहे.
रोजगारनिर्मितीसाठी कर्मचारी मर्यादा १०० ठेवणे उचित नाही. ही मर्यादा वाढविण्यात आल्याने रोजगारनिर्मिती होईल आणि नोकरभरतीला चालना मिळेल.
या विधेयकांमुळे कर्मचाºयांच्या हिताचे रक्षण होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य महामंडळाच्या व्याप्ती वाढवून कर्मचाºयांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा मिळेल

Web Title: Approval of three major labor reform bills in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.