पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद

By Admin | Updated: November 8, 2016 17:18 IST2016-11-08T12:32:16+5:302016-11-08T17:18:32+5:30

राजकोट जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे.

Another jawan martyr in Pakistan firing | पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद

पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. ८ - राजकोट जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा आणखी एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केले. राजकोट जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर जोरदारी गोळीबार करत तोपांचा मारा केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईतही पाकिस्तानी चौक्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
सकाळी पावणेनऊपासून हा गोळीबार सुरु आहे असे वरिष्ठ लष्करी अधिका-याने सांगितले. सोमवारी पाकिस्तानने पूँछ जिल्ह्यातील मेंढार सेक्टरमधील मानकोटे आणि बालाकोटे येथील तळांवर गोळीबार केला होता. 
 
रविवारी क्रिष्णा घाटीमध्ये दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करण्यासाठी  म्हणून पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आणि पाच जण जखमी झाले होते. 
 

Web Title: Another jawan martyr in Pakistan firing