भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:54 IST2025-06-09T19:53:54+5:302025-06-09T19:54:55+5:30

तुर्की दक्षिण आशियातील देशांमध्ये वर्कशॉप घेऊन आणि स्कॉलरशिप वाटून कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे.

Another Islamic country turkey is conspiring against India; Big revelation from intelligence report, read | भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा

भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा

नवी दिल्ली - भारताच्या शत्रू देशांची नावे सांगायची झाली तर चीन आणि पाकिस्तान यांचे नाव प्रखरतेने पुढे येते परंतु काही असेही देश आहेत जे भारताच्या पाठीमागून वार करत असतात. तुर्की ज्याप्रमाणे पाकिस्तानला मदत करतोय त्यामुळे त्या देशावर भरवसा ठेवता येत नाही. त्यात बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून त्यांची कृत्येही भारताविरोधातील असल्याचे दिसून येते. आता बांगलादेशातीलइस्लामिक कट्टरपंथी संघटना जमात ए इस्लामीला तुर्कीकडून मोठी फंडिंग मिळत असल्याचं सीक्रेट रिपोर्टमधून पुढे आले आहे.

भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये दहशतवाद पसरवला जाईल असा प्रयत्न तुर्की करत आहे. रिपोर्टनुसार, तुर्कीतील गुप्तचर यंत्रणा बांगलादेशातील कट्टरपंथींना मदत करण्यासाठी काम करत आहे. या एजन्सी केवळ वैचारिक पातळीवर नाही तर आर्थिक आणि सैन्य सहकार्यही कट्टरपंथींना करत आहे. तुर्कीने ढाकाच्या मोघबाजारात जमात ए इस्लामीचं नवं कार्यालय उघडण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी मोठा निधीही पाठवला आहे. दुसरीकडे जमातचे विद्यार्थी नेते सादिक कय्याम तुर्की दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात शस्त्रे गोदाम आणि कारखान्यात त्यांना फिरवल्याची माहिती आहे. तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन दक्षिण आशियात इस्लामिक संघटनांना पाठबळ देत आहे. दक्षिण आशियातील मुस्लिमांना एकत्र करण्यासाठी ते विविध कार्यक्रमही आयोजित करत आहेत. 

यातच बांगलादेश इन्वेस्टमेंट डिवलपमेंट अथॉरिटीचे चीफ आशिक चौधरीही तुर्कीत पोहचले होते. त्यांनी तुर्कीतील शस्त्रांच्या कारखान्याला भेट दिली. बांगलादेशाने थेट कुठल्याही सैन्य अधिकाऱ्याला तुर्कीला पाठवले नाही. तुर्कीत बांगलादेशाचे नॅशनल सिक्युरिटी अँन्ड इन्फॉरमेशन सल्लागारही बंद दाराआड बैठक करत आहेत. त्याशिवाय भारताजवळील म्यानमारमध्येही आर्मीला तुर्कीची मदत मिळण्याची शक्यता असल्याचे गुप्त रिपोर्टमधून उघड झाले आहे.

भारतासाठी किती मोठं आव्हान?

तुर्की दक्षिण आशियातील देशांमध्ये वर्कशॉप घेऊन आणि स्कॉलरशिप वाटून कट्टरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्लामिक संस्थांमध्ये तुर्कीची खूप चर्चा होत आहे. जिहादी विचारांना प्रोत्साहन देण्याचे काम तुर्की करत आहे. तुर्की ज्यारितीने काम करत आहे ते पाहता भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोरमसारख्या राज्यात परिणाम होऊ शकतो. जमात ए इस्लामीसारख्या संघटनांना तुर्की पैसे आणि शस्त्रे पुरवून पूर्वोत्तर राज्यात जिहादी विचारधारा वाढवण्याचं काम करत आहे. केरळमध्ये आधीच जमातशी निगडित एनजीओ कार्यरत आहेत. तुर्की आयएसआयलाही पैसे पाठवत आहे. त्यामुळे तुर्की बांगलादेशाला भारतासमोरील नवं आव्हान उभं करण्याचं षडयंत्र रचत असल्याचं या गुप्त रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
 

Web Title: Another Islamic country turkey is conspiring against India; Big revelation from intelligence report, read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.