शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात नेलं नाही म्हणून नाराज पत्नीनं संपवलं जीवन, दु:खात पतीनेही उचललं टोचाचं पाऊल, दोन मुलं झाली अनाथ    

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 14:34 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे  कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीने पत्नीला नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नी संतापाच्या भरात जीवन संपवलं.

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे  कौटुंबिक वादातून पती पत्नीने जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. पतीने पत्नीला नातेवाईकाच्या लग्नामध्ये न नेल्याने नाराज झालेल्या पत्नी संतापाच्या भरात जीवन संपवलं. त्यानंतर पत्नीचा मृत्यू झाल्याने दु:खी झालेल्या पतीने भरधाव ट्रेनसमोर उडी मारून आपल्याची जीवनाचा शेवट केला. मात्र पती पत्नीने अगदी किरकोळ वादातून उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे त्यांची दोन मुलं अनाथ झाली आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चांदपूर क्षेत्रातील ककराला गावातील रोहित कुमार याच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं. संपूर्ण कुटुंब लग्नाला गेलं होतं. तसेच रोहितची पत्नीही लग्नाला जाण्याची तयारी करत होती. मात्र रोहित मद्यपान करून घरी आला तेव्हा त्याने लग्नाला जाण्यास नकार दिला. त्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. तसेच रोहित रागाच्या भरात घरापासून दूर निघून गेला. तो गेल्यानंतर नाराज झालेल्या पत्नी पार्वतीने घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं.

काही वेळाने रोहित घरी आला. तेव्हा त्याने पत्नीला गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिलं. त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांना गोळा होत पार्वतीला खाली उतरवले आणि रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी पार्वतीला मृत घोषित केले. पत्नीचा मृत्यू झाल्याने धक्का बसलेला रोहितही नंतर घराबाहेर पडला आणि दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे मार्गावर पोहोचला. तिथे त्याने दिल्लीहून येत असलेल्या दिल्ली-कोटद्वार सिद्धबली एक्स्प्रेससमोर उडी घेत जीवन संपवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पती-पत्नीने अगदी किरकोळ कारणातून जीवन संपवल्याने दोन मुलं अनाथ झाली आहेत. त्यामध्ये ३ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार