शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशात चक्रीवादळाने लाखो लोकांचा गेला ‘निवारा’; आठ बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 01:41 IST

एक लाखांवर लोकांना हलविले, १,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत

विजयवाडा : निवार चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाने चित्तोरमध्ये सहा आणि कडप्पात दोन जण बेपत्ता झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, जोरदार पावसामुळे नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा जिल्ह्यांत १.१२ लाख लोकांना फटका बसला आहे. दोन हजारांवर घरांची पडझड झाली आहे. ८८ मोठी जनावरे, दोन हजारांहून अधिक लहान जनावरे आणि ८ हजारांवर कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. 

१,५९७ गावांना या पुराचा फटका बसला आहे. सहा गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २२३ शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. आतापर्यंत ४० हजारांवर व्यक्तींना पुरातून बाहेर काढण्यात आले असून, त्यांना आश्रय शिबिरात दाखल करण्यात आहे. चार जिल्ह्यांना मदतकार्यासाठी २.५० कोटी  रुपये जारी करण्यात आले आहेत. शिबिरातील प्रत्येकाला ५०० रुपये विशेष साहाय्य देण्यात आले.   

पिकांचे नुकसानप्राथमिक अंदाजानुसार, नेल्लोर, प्रकाशम, चित्तोर आणि कडप्पा, कुर्नूलमध्ये २.१४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाकडून पिकांच्या नुकसानीची माहिती एकत्रित केली जात आहे. राज्य सरकारने मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या आठ टीम आणि एसडीआरएफच्या सहा टीम तैनात केल्या आहेत. रेणीगुंटाजवळ फसलेल्या दोन लोकांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे, तसेच नेल्लोर जिल्ह्यातून फसलेल्या ६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.  

टॅग्स :cycloneचक्रीवादळ