शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:25 IST

5 Naxalites Killed In Chhattisgarh: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असतानाच इतके छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असतानाच इतके छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी १ हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं असून, सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत ५ नक्षलवादी मारले गेले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात करेगुट्टा डोंगरातील जंगलांमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांचं एक संयुक्त पथक नक्षल विरोधी अभियानावर निघालं होतं. त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत.  सूत्रांनी पुढे सांगितले की, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दलांनी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईत १ हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरलं आहे. या मोहिमेमध्ये छत्तीसगड, तेलंगाणा आणि महाराष्ट्रातील एक हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे.

तत्पूर्वी सुरक्षा दलांच्या पथकाने आपल्या शोधमोहिमेमध्ये बिजापूरमधील जंगलात काँक्रिटच्या स्लॅबपासून तयार करण्यात आलेली एक बंकरसारखी खोली उद्ध्वस्त केली आहे. तसेच आणखी नक्षल्यांच्या १२ ठिकाणांना नष्ट करण्यात आलं आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड