शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आपलेही झाले परके! 20 वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते भाऊ-बहीण; अवस्था पाहून सर्वच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 12:08 IST

दोन भावंडांचा समावेश असून यामध्ये महिलेने एम.ए. बीएड केले आहे.

पंजाबमधील लुधियाना येथील 'मनुख्ता दी सेवा सबसे बडी सेवा' या संस्थेने अनेक वर्षांपासून घरातील एका खोलीत कैद असलेल्या अंबाला कॅन्टोन्मेंट आणि शहरातील अशा तीन जणांची सुटका केली आहे. हे तिन्ही लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यामध्ये बोह गावातील रहिवासी दोन भावंडांचा समावेश असून यामध्ये महिलेने एम.ए. बीएड केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बोह गावातील भाऊ-बहीण गेल्या 20 वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते. त्याचे वडील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. तर अंबाला शहरातील जोगीवाडा येथून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. संघटनेचे लोक या तिघांना लुधियानाला घेऊन गेले आहेत. संस्थेशी संबंधित मिंटू मालवा यांनी सांगितले की, संस्था अशा लोकांना मदत करते, जे मंद आहेत, ज्यांना कोणीही मदत करत नाही.

मिंटू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ अंबाला यांच्याकडे आला होता. यानंतर वंदे मातरम दलाने मिळून या लोकांची सुटका केली आहे. या लोकांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं. तिघेही अत्यंत अस्वच्छतेत जगत होते. या सर्वांची मानसिक स्थिती कमकुवत आहे. सुटका करण्यात आलेली महिला सुशिक्षित असली तरी तिची मानसिक स्थिती चांगली नाही. या लोकांच्या नातेवाईकांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. मूलभूत सुविधांपासून ते वंचित होते. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"