शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:02 IST

Gujarat Plane Crash Video: गुजरातमध्ये एक भयंकर विमान अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरन उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच विमान एका नागरी वसाहतीजवळ कोसळले. 

Ahmedabad Plane Crash Video: २०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचेविमानाचा भीषण अपघात झाला. अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले होते. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. हा अपघात कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. 

एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागात कोसळले. 

ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात विमान हळूहळू जमिनीच्या दिशेने जाते आणि त्यानंतर काही क्षणातच मोठा स्फोट होतो.

एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ

अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. अग्निशामक दलाचे अधिकारी जयेश खडिया यांनी सांगितले की, दुर्घटना घडल्यानंतर विमानाला मोठी आग लागली. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निबंब पाठवण्यात आले आहेत. 

बचाव व मदत कार्यासाठी तातडीने एनडीआरएफच्या जवानांच्या तीन तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. ९० जवान गांधीनगरवरून अपघातस्थळी येत आहेत. त्याचबरोबर वडोदऱ्यावरूनही तीन तुकड्या पाठवल्यात आल्या आहेत. 

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान लंडनमधील गॅटविक एअरपोर्टवर उतरणार होते. पण, दुपारी ते अपघातग्रस्त झाले. अपघाताची अधिक माहिती घेतली जात आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादGujaratगुजरातAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमान