शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 21:18 IST

Air India plane crashes in Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात विमान उड्डाणानंतर कसे कोसळले हे दिसत आहे. 

Air India plane crash Video : प्रवासी आणि क्रू मेंबर्स अशा २४२ जणांना घेऊन लंडनच्या दिशेने झेपावलेल्या एअर इंडियाचेविमानाचा भीषण अपघात झाला. गुरुवारी (१२ जून) दुपारी ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच कोसळले आणि मोठा स्फोट झाला. या घटनेत लोकांचा तडफडून मृत्यू झाला. या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!   

एअर इंडियाचे AI171 हे विमान दिल्लीवरून आले होते आणि अहमदाबादवरून लंडन जात होते. प्राथमिक माहितीनुसार, विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेबर्स, असे एकूण २४२ लोक होते. 

विमानाने गुरुवारी (१२ जून) दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण केले. पण,त्यानंतर काही मिनिटांतच अहमदाबाद शहरातील मेघानीनगर भागात ते कोसळले. हे विमान कोसळले वैद्यकीय रुग्णालयाच्या वसतिगृहांच्या इमारतींवर!  

वाचा >>अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले

ज्या भागात एअर इंडियाचे विमान कोसळले, ते मेघानीनगर विमानतळापासून १५ किमी दूर आहे. विमान कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा व्हिडीओ

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून हवेत झेपावते. त्यानंतर विशिष्ट उंचीपर्यंत वर जाते. पण, त्यानंतर विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अधूंक दिसायला लागते. त्यावेळी ते जमिनीवर कोसळते आणि मोठा स्फोट होतो. 

अपघातग्रस्त झालेले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादमध्ये आले होते. काही वेळानंतर ते लंडनकडे निघाले होते. 

मृतांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत

या विमान अपघातात विमानातील २४० जण मरण पावले आहेत. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. 

या घटनेबद्दल टाटा समूहाने दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे. 

टाटा समूहाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जे जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च टाटा समूह करणार आहे. विमान अपघातात वसतिगृहाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याच्या उभारणीचा खर्चही टाटा समूह करणार आहे, असे चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातViral Videoव्हायरल व्हिडिओ