शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:12 IST

Ahmedabad Plane Crash Survivor: विमान अपघातात रमेश विश्वास यांचा जीव वाचला, मात्र त्यांचा भावाचा मृत्यू झाला.

Air India Plane Crash Survivor: काल म्हणजेच १२ जून २०२५ रोजी देशाला हादरुन टाकणारी घटना घडली. गुजरातच्या अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान(एआय-१७१) उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील विमानातील २४१ प्रवासी आणि क्रु मेंबर्ससह सुमारे २५ स्थानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण, या अपघातात चमत्कारीकरित्यात्या एका प्रवाशाचा जीव वाचला वाचला आहे.

विमान कोसळल्यानंतर त्यातील इंधनामुळे भीषण आग लागली, ज्यात सर्वांचा जळून मृत्यू झाला. मात्र, रमेश विश्वास नावाचा ब्रिटीश तरुण या भीषण अपघातातून वाचला आहे. विमान कोसळताना जेव्हा इमारतीला धडकले, त्याचवेळी रमेश विमानातून खाली पडल्यामुळे त्यांचा जीव वाचल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अपघातात त्यांचा भावाचा मृत्यू झाला आहे. हिंदी वृत्तवाहिनी आज तकने लंडनमध्ये रमेश यांच्या कुटुंबाशी बातचीत केली. 

पीएम मोदींनी घेतली भेट

यादरम्यान, रमेश विश्वास यांचा लहान भाऊ नयन याने सांगितले की, अपघातानंतर आमचे रमेश याच्याशी बोलणे झाले, तो सध्या रुग्णालयात आहे. पण, आमचा दुसरा भाऊ अजयबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. आम्ही अजयबद्दल काय माहिती मिळते, याची वाट पाहत आहोत. आम्ही लवकरच भारताला रवाना होत आहोत. आम्हाला आशा आहे की, विश्वास जसा सुरक्षित आहे, तसेच अजयबद्दलही काही चांगली बातमी मिळेल. 

रमेश विश्वासने अपघाताबद्दल काय सांगितले? असे विचारले असता नयन म्हणाला की, त्यालाही विमान कसे कोसळले आणि तो कसा वाचला, हे त्यालाही काही कळत नाहीये. तो वाचला, यातच आम्ही समाधानी आहे, परंतु अजयबद्दल काहीही माहिती नसल्याने कुटुंबीय चिंतेत असल्याची प्रतिक्रिया नयन याने व्यक्त केली. दरम्यान, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघातNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात