शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:02 IST

Ahmedabad Plane Crash Black Box: या अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Air India Plane Crash Black Box: अहमदाबादमधीलविमानअपघातात आतापर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात बसलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुदैवाने एक प्रवासी बचावला आहे. मृतांपैकी २२९ प्रवासी होते, तर १२ क्रू मेंबर होते. याशिवाय ज्या मेडिकल कॉलेज-हॉस्टेलवर विमान कोसळले, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ५६ जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, विमान अपघाताची चौकशी तीव्र करण्यात आली आहे. सरकारने चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला

अहदमाबाद विमानतळावरुन टेकऑफ केल्यानंतर काही सेकंदातच विमान कोसळल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानात ऐनवेळी काय तांत्रिक बिघाड झाला? वैमानिकाला विमान नियंत्रणात का आणता आले नाही? अखेरच्या क्षणाला विमानात नेमकी काय परिस्थिती होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत.

विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाअपघाताच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच आज ढिगाऱ्यात बोईंग ७८७ ड्रीमलाइनरचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर सापडले आहे. त्यामुळे लवकरच अपघाताचे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.

पंतप्रधान मोदींचा अहमदाबाद दौरापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघातस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हेदेखील होते. तर, गृहमंत्री अमित शाहा यांनी कालच घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला होता. 

अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठकत्यानंतर विमान अपघाताबाबत पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल घेतला आणि पुढील कृती आराखड्यावर चर्चादेखील केली. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाairplaneविमानAccidentअपघात