शुभवर्तमान! कृषी उत्पादनात होईल २.५ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:12 AM2020-06-06T05:12:29+5:302020-06-06T05:12:39+5:30

क्रिसीलचा संशोधन अहवाल

Agricultural production will increase by 2.5 per cent | शुभवर्तमान! कृषी उत्पादनात होईल २.५ टक्क्यांनी वाढ

शुभवर्तमान! कृषी उत्पादनात होईल २.५ टक्क्यांनी वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे विविध अर्थक्षेत्रे बाधित होत असतानाच देशातील कृषिक्षेत्राने मात्र वाढीचे दिलेले सकारात्मक संकेत हे निश्चितच चांगले लक्षण आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्रामध्ये २.५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


क्रिसील या पतमापन संस्थेने केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच प्रकाशित केला असून, त्यामध्ये वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी कृषिक्षेत्राला टोळधाडीसारख्या काही समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. चालू वर्षात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशाची अर्थ-व्यवस्था आंकुचन पावण्याचा अंदाज व्यक्त होत असताना कृषिक्षेत्रातील वाढ समाधान देणारी ठरणार आहे.

च्लॉकडाऊननंतर देशातील फळे आणि नगदी पिकांची उपलब्धता कमी होण्याची मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. फळे ही नाशवंत असून, ती अधिक काळ टिकू शकत नाहीत. आपल्या देशात कोल्डस्टोरेजची फारसी व्यवस्था नसल्याने त्याचा परिणाम फळांच्या वितरणावर होतो. यामुळे फळांची उपलब्धता कमी होऊ शकते.
च्देशात अचानक सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरांची उपलब्धता न झाल्याने काही नगदी पिके ही शेतात कापणी न होताच तशीच पडून राहिली. त्यातच काही ठिकाणी टोळधाडीचे संकट आल्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे देशातील नगदी पिकांचे बाजारात येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.

दुधाच्या खपामध्ये कोणताही फरक नाही
देशातील कृषी उत्पादनापैकी एकतृतीयांश वाटा हा दूध उत्पादनाचा आहे. गेले दोन महिने लॉकडाऊन सुरू असतानाही दुधाच्या खपामध्ये फारसा फरक पडलेला दिसून आला नाही ही समाधानाची बाब आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून दुधाचा खप १५ ते २० टक्के होतो. हा खपही लवकरच पूर्ववत होण्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Agricultural production will increase by 2.5 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.