शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या निधनानंतर ५ मुलं बनली अनाथ, कलेक्टर साहेबांनी दिला मदतीचा हाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:09 IST

पाच वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर, जंगलातून लाकडं आणून आपला उदरनिर्वाह भागवणारी, आपल्या ५ मुलांचा सांभाळ करणाऱ्या मालतीचे निधन झाले.

रांची - आई-वडिलाच्या मृत्यूनंतर अनाथ बनलेल्या ५ मुलांची भेट घेऊन तीन मुलांचा शाळेत दाखला करण्याचं काम महाराष्ट्राचे सुपुत्र आणि कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी केलंय. कोरडमा शहरातील छोटगी बागी वार्ड नंबर १ मधील एका गरीब कुटुंबातील मालती या महिलेचे निधन झाले. अगोदरच वडिलांचे निधन झाले होते. आता, आईही सोडून गेली. त्यामुळे या कुटुंबातील ५ मुलांसमोर जगण्याचा, भविष्याचा प्रश्न पडला होता. मात्र, कोडरमाचे संवेदनशील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी तात्काळ पीडित कुटुंबाला भेट देऊन या पाचही मुलांची प्रशासनाच्या वतीने जबाबदारी घेतली. 

पाच वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर, जंगलातून लाकडं आणून आपला उदरनिर्वाह भागवणारी, आपल्या ५ मुलांचा सांभाळ करणाऱ्या मालतीचे निधन झाले. त्यामुळे, घरातील मोठे असलेल्या १८ वर्षीय मानिसकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा अन् ९ वर्षीय मुलाच्या जीवनातही अंधकार निर्माण झाला होता. आईचा आधार गेल्याने एकाच कुटुंबातील ५ मुले निराधार बनले होते. याबाबत, कोडरमाचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांना माहिती मिळताच पीडित कुटुबींयाच्या घरी जाऊन ते या चिमुकल्यांचा आधार बनले. घोलप यांनी स्वत: पालक बनून कुटुंबातील तीन मुलांचा कस्तुरबा बालिका निवासी विद्यालयात प्रवेश घेतला. काजलकुमारी १५ वर्षे, सुनिता कुमारी १३ वर्षे आणि अनिता कुमारी ११ वर्षे यांना इतर शालेय साहित्य व कपडेही देऊ केले. 

निराधार बनलेल्या तीन मुलींना सनदी अधिकारी रमेश घोलप यांच्यामुळे सुरक्षेसह शिक्षणाचा आधार मिळाला आहे. घोलप यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी व स्वताकडून पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत केली. तसेच, राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजनेतून २० हजार रुपयांचा लाभही दिला. या पीडित कुटुंबातील तीन मुलांना बाल संरक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा २००० रुपये मदत मिळेल, अशी व्यवस्थाही घोलप यांनी केली आहे.  आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाचही मुलांचं उत्तम आरोग्य व वैद्यकीय मदतीसाठी गोल्डन कार्डही बनवून देण्यात आले आहे. रमेश घोलप हे अतिशय संवेदनशील अधिकारी असून यापूर्वीही त्यांच्या कार्याची, त्यांच्या ऑन द स्पॉट मदतीची प्रचिती कोडरमा जिल्ह्याने अनुभवली आहे. झारखंड राज्यातील कार्यक्षेत्रात पेन्शवाला साहब अशी त्यांची ओळख बनली आहे. घोलप यांनीही अंत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत मजल मारल आहे. त्यामुळे, पावलोपावली त्यांच्यातील माणूसकी पाहायला मिळते. घोलप यांच्या या संवेदनशीलपणामुळे मोठ्या मुलीने साहेबांचे आभार मानले. या पाचही मुलांना आशीर्वाद देत, आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार करा, असे घोपल यांनी म्हटले. या संवेदनशील प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही कलेक्टरसाहेबांचं कौतुक होत असून वाडीतील गरिबांनाही आनंद झाला आहे.  

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJharkhandझारखंडranchi-pcरांची