शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:24 IST

लग्नाची वरात घेऊन पत्नीच्या घरी आलेल्या वराला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगढा गावात लग्नाची वरात घेऊन पत्नीच्या घरी आलेल्या वराला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

तीन महिन्यांपूर्वी झाले होते लग्नमार्च महिन्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत दोघांचे विवाह सोहळा पार पडला होता. परंतु, त्या वेळी काही पारंपरिक विधी बाकी राहिल्याने वर पक्षाने सोमवारी (३ जून) पुन्हा थाटामाटात लग्नाचा कार्यक्रम ठेवला होता. वर वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचला खरा, पण तेथून त्याला वधूशिवायच घरी परतावे लागले.

कशामुळे झाला वाद?वराने वधूसाठी आवश्यक कपडे, दागिने आणि मेकअपचे सामान आणले नव्हते, हेच या वादाला कारणीभूत ठरले. वधूच्या वडिलांनी आणि संपूर्ण कुटुंबियांनी याचा तीव्र निषेध केला. तर, वधूनेदेखील लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सासरच्यांनी वरात आल्या पावली परत पाठवली. या दरम्यान काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र,  वधूचा निर्णय अंतिम ठरला.

पोलीस काय म्हणाले?या घटनेबाबत हलिया पोलीस स्टेशनचे एसएचओ वीरेंद्र सिंह म्हणाले की, त्यांना याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार नोंद झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संपूर्ण परिसरात चर्चेचा विषयया अनोख्या घटनेने स्थानिक परिसरात चांगलीच खळबळ उडवली आहे. लग्न झाल्यानंतर पुन्हा एकदा विधी करण्याचा प्रयत्न, आणि त्यात वधूचा स्पष्ट नकार – ही संपूर्ण कथा आता सामाजिक चर्चेचा विषय बनली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल