अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'किन्नर आखाड्यातून' हकालपट्टी; शंकराचार्यांवरच्या टीकेनंतर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 18:50 IST2026-01-27T18:49:03+5:302026-01-27T18:50:05+5:30

Mamta Kulkarni expelled Kinnar Akhara शंकराचार्यांना खोटे म्हणणं ममता कुलकर्णीला नडलं. किन्नर आखाड्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Actress Mamta Kulkarni expelled from 'Kinnar Akhara'; stir after Shankaracharya's criticism | अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'किन्नर आखाड्यातून' हकालपट्टी; शंकराचार्यांवरच्या टीकेनंतर खळबळ

अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'किन्नर आखाड्यातून' हकालपट्टी; शंकराचार्यांवरच्या टीकेनंतर खळबळ

प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) हिची 'किन्नर आखाड्या'तून हकालपट्टी करण्यात आली आहे. आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या निर्णयाची अधिकृत पुष्टी केली.

त्रिपाठी म्हणाल्या की, "आखाड्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता ममता कुलकर्णीशी आखाड्याचा कोणताही संबंध नाही. ती आता आखाड्याची अधिकारी किंवा सदस्य नाही. आमच्या आखाड्यात महिला, पुरुष आणि किन्नर सर्व आहेत. आम्हाला कोणताही वाद नको आहे. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी ज्या प्रकारे बटुक ब्राह्मणांना शिखा धरून मारहाण झाली, त्याबद्दलही आमची तीव्र नाराजी आहे."

ममता कुलकर्णीचा 'तो' वादग्रस्त दावा
२५ जानेवारी रोजी ममता कुलकर्णीने शंकराचार्य वादावर बोलताना खळबळजनक विधान केले होते. ती म्हणाली होती की, "१० पैकी ९ महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत आणि त्यांना शून्य ज्ञान आहे." याशिवाय तिने शंकराचार्यांना दोन रोखठोक प्रश्न विचारले होते. यामध्ये त्यांची शंकराचार्य पदी नियुक्ती कोणी केली? व कोट्यवधींच्या गर्दीत पालखी घेऊन निघण्याची काय गरज होती? यावरून ही कारवाई झाली आहे.

"मी हकालपट्टी नाही, तर राजीनामा दिलाय" 
आखाड्यातून काढल्याच्या वृत्तावर ममता कुलकर्णीने वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली, "मी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. खरं तर महामंडलेश्वर पद हे अनेक वर्षांच्या आध्यात्मिक तपस्येतून मिळतं. मी पाहिलंय की, खरा महंत किंवा महामंडलेश्वर होण्यासाठी अनेक वर्ष ध्यान आणि शिस्तीतून जावं लागतं."

Web Title : शंकराचार्य की आलोचना के बाद ममता कुलकर्णी किन्नर अखाड़ा से निष्कासित

Web Summary : शंकराचार्य की आलोचना करने पर अभिनेत्री ममता कुलकर्णी को किन्नर अखाड़ा से निष्कासित कर दिया गया। अखाड़े ने उनके विवादास्पद बयानों और मठवासी परंपराओं की अवहेलना को निष्कासन का कारण बताया, जबकि कुलकर्णी ने इस्तीफे का दावा किया।

Web Title : Mamta Kulkarni Expelled from Kinnar Akhada After Criticism of Shankaracharya

Web Summary : Actress Mamta Kulkarni was expelled from Kinnar Akhada for criticizing Shankaracharya. The Akhada cited her controversial statements and disregard for monastic traditions as reasons for her removal, despite her claims of resignation.