पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई

By Admin | Updated: February 1, 2016 00:03 IST2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाईमनपाकडून स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती औरंगाबाद : मनपा प्रशासनाने शहरातील पार्किंगच्या जागा हडपणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ...

Action soon against the parking spaces | पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई

पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई

>पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई
मनपाकडून स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती
औरंगाबाद : मनपा प्रशासनाने शहरातील पार्किंगच्या जागा हडपणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. याशिवाय अतिक्रमणविरोधी कारवाईला गती देण्यासाठी शहराची चार भागात विभागणी करून त्यांच्याकडे प्रत्येकी एकेका भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शहरात असंख्य ठिकाणी पार्किंगच्या जागांवर बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याबाबतच्या तक्रारी सातत्याने मनपाकडे येत असतात; परंतु इमारत निरीक्षक, कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे त्याविरुद्ध कारवाया होत नाहीत. प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ही बाब विचारात घेऊन प्रशासकीय विभागाला प्रशासकीय अधिकारी वाढवून दिले आहेत. उपअभियंता शिरीष रामटेके, बी. जी. बोईनवाड यांची आठवडाभरापूर्वीच प्रशासकीय विभागात बदली करण्यात आली होती. त्यानुसार महावीर पाटणी, अजमत खान यांच्याकडील भागाची विभागणी करण्यात आली आहे. रामटेके यांच्याकडे प्रभाग अ मधील अतिक्रमणांबरोबरच पार्किंग गिळंकृत करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बोईनवाड यांच्याकडे प्रभाग ब, अजमत खान यांच्याकडे प्रभाग क आणि ड तर महावीर पाटणी यांच्याकडे इ व फ प्रभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
----------
५ इमारत निरीक्षक वाढणार
प्रशासकीय विभागात सध्या ८ इमारत निरीक्षक आहेत. १३ लाख लोकसंख्येसाठी ही संख्या कमी असल्यामुळे आणखी ५ इमारत निरीक्षक द्यावेत, अशी मागणी प्रशासकीय विभागाने आयुक्तांकडे केली आहे.

Web Title: Action soon against the parking spaces