शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरशी सामना अन् १० वीच्या परीक्षेत ९६.६%; मृत्यूशी झुंज देणाऱ्या आरवची गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:49 IST

ज्या वयात मुलं खेळण्या-बागडण्यात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मग्न असतात, त्या वयात आरव कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत होता. मात्र या संघर्षातही त्याने अभ्यास सोडला नाही.

मनामध्ये जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर अशक्य गोष्टी शक्य होतात. दिल्लीच्या मेहरौली भागात राहणाऱ्या १५ वर्षांच्या आरवने हे सत्यात उतरवून दाखवलं आहे. ज्या वयात मुलं खेळण्या-बागडण्यात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मग्न असतात, त्या वयात आरव कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत होता. मात्र या संघर्षातही त्याने अभ्यास सोडला नाही. याचाच परिणाम म्हणजे, सीबीएसई (CBSE) १० वीच्या बोर्ड परीक्षेत आरवने ९६.६% गुण मिळवून सर्वांनाच थक्क केलं आहे.

आरवचं हे यश एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. त्याचे वडील अजय अरोरा, जे स्वतः एक डॉक्टर आहेत, त्यांनी सांगितलं की, २०२२ मध्ये आरवला कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्याच्या पाठीच्या कण्यावर मोठी सर्जरी करण्यात आली. सुमारे एक वर्ष आरव घर आणि रुग्णालय हेच करत होता. पण त्याने हार मानली नाही. रुग्णालयात उपचार सुरू असतानाही तो मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन क्लासला उपस्थित राहायचा.

आरवच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाच्या अपेक्षा खूप कमी होत्या. ते म्हणतात, "आरवने फक्त कसंबसं पास व्हावं, इतकीच आमची इच्छा होती. आजारपण आणि उपचारांच्या प्रचंड ओझ्याखाली अभ्यास करणं खूप कठीण होतं. पण जेव्हा निकाल लागला, तेव्हा आम्हा सर्वांची बोलतीच बंद झाली. आरवने आपल्या कष्टाने आम्हा सर्वांना निशब्द केलं आहे."

आरव हा केवळ एक विद्यार्थी नाही, तर एक जिज्ञासू योद्धा आहे. उपचारादरम्यान तो स्वतःच्या आजाराबद्दल माहिती वाचायचा आणि डॉक्टरांना प्रश्न विचारायचा. त्याच्या या सकारात्मक विचारसरणीनेच त्याला या कठीण काळातून बाहेर पडण्यास मदत केली. मित्र आणि समुपदेशकांनीही या संघर्षाच्या काळात त्याला पूर्ण पाठिंबा दिला.

आरवला गणिताची प्रचंड आवड आहे. भविष्यात त्याला 'अॅस्ट्रोफिजिक्स'मध्ये (खगोलशास्त्र) शिक्षण घ्यायचं असून, 'इस्रो' (ISRO) किंवा 'नासा' (NASA) सारख्या मोठ्या अंतराळ संस्थांमध्ये संशोधक म्हणून काम करण्याचं त्याचं स्वप्न आहे. फावल्या वेळेत आरवला थोर पुरुषांची प्रेरणादायी पुस्तकं वाचायला आवडतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलStudentविद्यार्थीcancerकर्करोग