शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड नाही म्हणून चिडवणे बेतले जिवावर; संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने केले ते धक्कादायक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:20 IST

प्रेयसी नसल्याने दिशांत नेहमी डिवचायचा त्यामुळे आरोपी संतापला.

राग हा क्षणिक असतो पण रागाच्या भरात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी नाही म्हणून डिवचणाऱ्या मित्राची हत्या करण्यात आली आहे. गुजरातमधील वडोदरा येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. मित्र सतत प्रेयसी नसल्याचा टोला लगावत असल्याने संतापलेल्या अल्पवयीन तरूणाने धक्कादायक कृत्य केले. मृत तरूण आरोपी तरूणाला तुला प्रेयसी नाही म्हणून डिवचायचा. यावरून अल्पवयीन आरोपी संतापला आणि आपल्या मित्राचाच जीव घेतला. 

आरोपी तरूणाने त्याचा मित्र दिशांक राजपूतला स्थानिक दिवालीपुरा परिसरात फिरण्यासाठी बोलावले होते. दिशांत त्याचा मित्र रंजीत माळीसोबत ठरलेल्या जागी पोहोचला. तिथे आरोपी देखील आपल्या सहकारी मित्रांसह आला होता. ते चौघे परिसरातील एका कॉलनीजवळ गेले, जिथे आरोपीने अचानक चाकू काढला आणि दिशांतवर हल्ला करण्यास सुरुवात केली. 

तरूणानं केलं ते धक्कादायक दिशांतची हत्या करून दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. दोन्ही आरोपींनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. हल्लेखोर तरूणासह इतर एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले असून चौकशी सुरू आहे. दिशांतने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मित्रपरिवार मोठा आहे, ज्यामध्ये तरूणींची संख्या आहे. दिशांत आणि मृत तरूण एकाच ट्युशनमध्ये होते. तिथे मृत दिशांत आरोपी तरूणाला प्रेयसी नसल्यावरून सतत चिडवत असे.

दरम्यान, प्रेयसी नसल्याने दिशांत मुलींसमोर नेहमी डिवचायचा त्यामुळे आरोपी संतापला. केवळ या कारणावरून नाराज आरोपीने दिशांतचा काटा काढण्याचे ठरवले. दिशांतला धडा शिकवण्यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत योजना आखली अन् त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीसह एका मुलाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट