शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 05:48 IST

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले.

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी १०वी व १२वीच्या परीक्षेत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी नापास झाले. केंद्रीय शिक्षण मंडळापेक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये नापास होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे केंद्रीय शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. त्यातील निष्कर्षांत म्हटले आहे की, सरकारी शाळा, महाविद्यालयांतून मुलांच्या तुलनेत मुलींनी अधिक संख्येने बारावीची परीक्षा दिली. मात्र, याच्या अगदी उलट चित्र खासगी शाळा किंवा सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमध्ये होते. गेल्या वर्षी इयत्ता दहावीतील ३३.५ लाख विद्यार्थी पुढच्या इयत्तेत पोहोचले नाहीत. ५.५ लाख विद्यार्थी १०वीच्या परीक्षेला बसले नाहीत तर २८ लाख विद्यार्थी नापास झाले. 

त्याचप्रमाणे गेल्यावर्षी ३३.५ लाख विद्यार्थी १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यातील ५.५ लाख विद्यार्थी परीक्षेलाच बसले नाहीत तर २८ लाख जण परीक्षेत नापास झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दहावी नापासांत मध्य प्रदेश पहिला दहावीत अपयश आलेले सर्वाधिक विद्यार्थी मध्य प्रदेशात, त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशचा क्रमांक. बारावीत नापासांचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात.  त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण