शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ६ जणांची मंत्रिपदासाठी नावे

By admin | Updated: May 23, 2014 04:24 IST

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील तीन नेत्यांनी एकत्र बसून राज्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे पक्षनेतृत्वाकडे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी निश्चित केली आहेत.

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील तीन नेत्यांनी एकत्र बसून राज्यातील संभाव्य मंत्र्यांची नावे पक्षनेतृत्वाकडे आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे देण्यासाठी निश्चित केली आहेत. विश्वसनीय सूत्रांनी गुरुवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, जालन्याचे रावसाहेब दानवे, अहमदनगरचे दिलीप गांधी, अकोल्याचे संजय धोत्रे, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण, मुंबईतील किरीट सोमय्या आणि राज्यसभा सदस्य पीयूष गोयल यांचा या यादीत समावेश आहे. अर्थात, ही नावे राज्यमंत्रिपदासाठी देण्यात आली असली तरी गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपदही दिले जाऊ शकते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. गोयल यांनी संपूर्ण निवडणूक प्रचाराचे अत्यंत चांगले नियोजन केले होते. ते मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. त्याचवेळी नितीन गडकरी यांच्याशीही त्यांचे सख्य आहे. रावसाहेब दानवे किंवा संजय धोत्रे यांच्यापैकी एक नाव निश्चित होईल. दानवे हे पक्षात अधिक ज्येष्ठ असल्याने त्यांना झुकते माप दिले जाऊ शकते. गडकरी आणि अहीर यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर धोत्रेंच्या रूपाने विदर्भाला तिसरे मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. शिवाय दानवे यांच्या समावेशाने मराठवाड्याला संधी मिळून प्रादेशिक समतोल साधला जाईल, असा तर्क आहे. आदिवासी समाजातून प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे. याआधी पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे नाव घेतले जात होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे नाव आधी चर्चेत नव्हते; पण आता संभाव्य यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. २६ तारखेला कॅबिनेट तर नंतरच्या विस्तारात राज्यमंत्र्यांची वर्णी लागणार आहे.