गुगल प्ले स्टोअरवरून ५ प्रसिद्ध ॲप्स गायब! अश्लील कन्टेन्टमुळे सरकारची कारवाई; तुमचं आवडतं ॲप तर यात नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 08:58 IST2026-02-25T08:50:19+5:302026-02-25T08:58:38+5:30

केंद्र सरकारने मंगळवारी अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणाऱ्या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मना ब्लॉक केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने योग्य प्रक्रियेनंतर, पाच ओटीटी प्लॅटफॉर्मना ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

5 famous apps missing from Google Play Store Government action due to obscene content; Your favorite app is not among them, right? | गुगल प्ले स्टोअरवरून ५ प्रसिद्ध ॲप्स गायब! अश्लील कन्टेन्टमुळे सरकारची कारवाई; तुमचं आवडतं ॲप तर यात नाही ना?

गुगल प्ले स्टोअरवरून ५ प्रसिद्ध ॲप्स गायब! अश्लील कन्टेन्टमुळे सरकारची कारवाई; तुमचं आवडतं ॲप तर यात नाही ना?

केंद्र सरकारने मंगळवारी अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेट प्रसारित करणाऱ्या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने योग्य प्रक्रियेनंतर पाच ओटीटी प्लॅटफॉर्म, मूडएक्सव्हीआयपी, कोयल प्लेप्रो, डिजी मूव्हीप्लेक्स, फील आणि जुगनू यांना ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला आहे.

सरकारने इंटरनेट सेवा प्रदात्यांना माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ आणि अश्लीलता विरोधी कायद्यांतर्गत ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

"दुर्घटनाग्रस्त एअर अ‍ॅम्ब्युलन्स विमानात 'ब्लॅक बॉक्स' नव्हता..."; तपास अधिकाऱ्यांची माहिती

हे नियम सार्वजनिक सभ्यता राखण्यासाठी, राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नैतिक पत्रकारिता पद्धती लागू करण्यासाठी आहेत.

ही कारवाई माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९अ नुसार करण्यात आली आहे, जी सरकारला विविध कारणांसाठी ऑनलाइन सामग्री ब्लॉक करण्याचा अधिकार देते.

कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले

हे प्लॅटफॉर्म अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट प्रदर्शित करत होते. ही कंटेंट आयटी कायदा २०००, आयटी नियम २०२१, भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ आणि महिलांचे अनुचित पद्धतीने चित्रण करण्याशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले.

सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये उल्लू-एएलटीटीसह २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती. एएलटीटी अ‍ॅप एप्रिल २०१७ मध्ये चित्रपट आणि टीव्ही निर्माती एकता कपूर यांनी लाँच केले होते. उल्लू अ‍ॅप २०१८ मध्ये आयआयटी कानपूर पदवीधर विभू अग्रवाल यांनी तयार केले होते.

यापूर्वी, मार्च २०२४ मध्ये, सरकारने अश्लील कंटेंटसाठी १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. याव्यतिरिक्त, १९ वेबसाइट्स, १० अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्यात आले होते.

Web Title : गूगल प्ले स्टोर से 5 ऐप्स अश्लील सामग्री के कारण गायब!

Web Summary : सरकार ने अश्लील सामग्री प्रसारित करने के कारण मूडएक्स सहित पांच ओटीटी प्लेटफार्मों पर प्रतिबंध लगाया। यह कार्रवाई आईटी कानूनों और सार्वजनिक शालीनता का उल्लंघन करने के कारण की गई है। उल्लू और एएलटी बालाजी जैसे प्लेटफार्मों पर पहले भी प्रतिबंध लगाए गए थे।

Web Title : Google Play Store Removes 5 Apps Due to Obscene Content

Web Summary : Government bans five OTT platforms, including MoodX, Koyl, and Jugnu, for broadcasting obscene content violating IT laws and public decency. This action follows previous bans on other platforms like Ullu and ALTBalaji for similar violations.