शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

युवक आणि महिलांना मिळाली संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:59 IST

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.

ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक

आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.साधारणत: २५ ते ३० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी, विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने अ‍ॅड. विलास लोणारी यांना उमेदवारी मिळाल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. पूर्वीच्या काळी कोणतीही निवडणूक असो कार्यकर्त्यांची फळी तयार असे. कोणत्याही कार्यकर्त्याला आमंत्रण द्यावे लागत नव्हते. सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून नाशिकमधून लोणारी निवडून आले होते. कारण कार्यकर्ते त्यांचा अथकपणे प्रचार करीत होते. आताच्या काळात मात्र बंडखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सर्व पक्षांत बंडखोरी करीत या पक्षातून त्या पक्षात उडी घेत आहेत. जसे काही वाहन बदलतात त्याप्रमाणे आजकाल लोक पक्ष बदलत आहेत. पूर्वीच्या काळी नेत्यांच्या शब्दांना मोल होते. वचनबद्धता पाळली जात असे. त्या काळात काँग्रेस पक्षाने अनेक महिलांना संधी दिली होती. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमदार म्हणून कार्य केले आहे. तसेच बीडमधून केशरबाई क्षीरसागर, दाभाडीतून पुष्पाताई हिरे, सिन्नरमधून वाजेताई, नाशिकमधून शोभा बच्छाव यांनी विधानसभेत आमदार व त्यानंतर मंत्रिपददेखील भूषविले आहे. मलादेखील नाशिकमध्ये उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपददेखील मी भूषविले आहे. पक्षातील आणि कार्यकर्त्यांच्या बळावर महिलांना आणि तरुणांना राजकारणात संधी मिळू शकते, हे मी अनुभवातून सांगते. फक्त त्यासाठी काम करण्याची जिद्द आणि संयम हवा.-सुमनताई बागले

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक