शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे सराव सामना

By admin | Updated: July 23, 2014 00:35 IST

चंद्रशेखर टिळक : मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान

 

नाशिक : मोदी सरकारने शपथविधी घेतल्यानंतर ५० दिवसांत सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘अच्छे दिन अब आनेवाले है’ असे नाही, तर ‘अच्छे दिन आयेंगे’ असे म्हटले आहे. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा सराव सामना असून, त्यात नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट व लघु उद्योग भारती आयोजित अर्थसंकल्पविषयक व्याख्यानात बोलताना केले.मुंजे इन्स्टिट्यूटच्या सभागृहात ‘अंदाजपत्रक २०१४ : औद्योगिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना टिळक यांनी सांगितले, यंदाच्या अर्थसंकल्पात काही नाही यापेक्षा जे आहे त्याचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, याचा विचार करावा. मुळात ५० दिवसांत सादर झालेल्या या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीला साडेसहा ते सात महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. मास्टरस्ट्रोक अशा तीन तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. सरकारने काश्मिरी निर्वासितांसाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. यामुळे काश्मिरी अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. रोजगारनिर्मिती वाढणार आहे. संरक्षण या शब्दाची व्याप्ती रुंदावणारा हा अर्थसंकल्प आहे. ही एक केवळ तरतूद नाही तर त्यात देशाला पुढे नेणारा विचार आहे. अरुणाचल प्रदेशात एक हजार टेलिकॉम कम्युनिकेशन टॉवर उभे राहणार आहेत. राजकारण बाहेर टाकणारी ही तरतूद आहे. मणिपूरमध्ये स्पोर्ट्स अकॅडमीची उभारणी हा सुद्धा मोठा मास्टरस्ट्रोक आहे. रुढार्थाने संरक्षणात न बसणाऱ्या, पण संरक्षण करणाऱ्या या तरतुदी असल्याचेही टिळक यांनी सांगितले. सन २०१५ चा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पोस्ट, बॅँका उभ्या राहतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. प्रारंभी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाठक, सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, मुंजे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नारायण दीक्षित, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी उपस्थित होते. (प्रतिनिधी)