शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मांडवडच्या महिलांचा तहसीलसमोर ठिय्या

By admin | Updated: July 22, 2014 01:04 IST

मोर्चा : तहसीलदारांना निवेदन; प्रश्नांचा भडिमार

नांदगाव : दहा दिवसांपूर्वीच स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्ड असूनही धान्य मिळत नसल्यामुळे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या मांडवड येथील महिलांनी आज पुन्हा एकदा तहसील कार्यालयात आपला जोरदार आवाज उठवला. आजच्या मोर्चाचे नेतृत्व विजय अहेर, दीपक काकळीज यांनी केले.एकीकडे महिलांची घोषणाबाजी सुरु असताना मांडवडच्या ग्रामस्थांनी पुरवठा अधिकारी विजय थोरात यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत थोरातांनी २४८ कार्ड वितरण २३ जुलैपर्यंत करू, दुकानदाराचा परवाना निलंबित करू, सोसायटीला मांडवडचे दुकान जोडू, नियंत्रित दराने रॉकेल विक्री करू अशा प्रकारचे लेखी आश्वासन दिल्याने मांडवड येथील या महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.आंदोलन सुरू असतानाच तालुक्यातील कऱ्ही येथील महिलाही धान्य दुकानदाराकडून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन धडकल्यात. या महिलांना मात्र कोणत्याही प्रकारचे लेखी आश्वासन मिळाले नाही. धान्य दुकानदारांविरुद्धच्या तक्रारी वाढत असताना चौकशी सुरु आहे, कार्यवाही करू अशी साचेबंद उत्तरे संबंधितांकडून मिळत आहेत. रेशनकार्ड मिळवायचे असल्या पाच हजारांपर्यंत पैसे मोजावे लागतात, एवढे करुनही मिळालेल्या रेशन कार्डांवर धान्य मिळत नाही या तक्रारींचे प्रमाण वाढू लागल्याने नांदगाव तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर नेमके नियंत्रण कोणाचे? रेशनकार्ड बोगस म्हणून तहसीलदार पुरवठा विभागाकडे अंगुलीनिर्देश करतात तर हे सर्व बोगस ठरणार असेल तर यंत्रणाप्रमुख म्हणून तहसीलदार ते रद्द का करत नाहीत असा बचाव पुरवठा विभागातील कर्मचारी करत आहेत. (वार्ताहर)